Farm Loan Waiver: जुन्या पात्र शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीच्या हालचाली
Cooperation Minister Babasaheb Patil: २०१७ आणि २०१९ मध्ये झालेल्या कृषी कर्जमाफीमध्ये पात्र असतानाही लाभ न मिळालेल्या ६ लाख ५६ हजार शेतकऱ्यांच्या याद्या ३१ जानेवारीपूर्वी अद्ययावत करून महाआयटीने सहकार विभागाला प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिले आहेत.