Veterinary Guidelines for Livestock Health: राज्यात वाढते तापमान आणि उष्णलहरींचा धोका लक्षात घेता पशुधनाच्या सुरक्षिततेसाठी पशुसंवर्धन विभागाने व्यापक तयारी केली आहे. सावली, स्वच्छ पाणी आणि संतुलित आहार यावर भर देत विविध मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत, अशी माहिती आयुक्त डॉ. किरण पाटील यांनी दिली..उष्णतेच्या काळात पशुधनाला खेळती हवा असलेल्या ठिकाणी ठेवणे, स्वच्छ व थंड पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे, तसेच आहारात क्षार मिश्रणे आणि जीवनसत्त्वांचा समावेश करणे आवश्यक आहे. दुभत्या जनावरांना संतुलित आहार देण्यावर विशेष भर देण्यात आला आहे..World Veterinary Day: पशुवैद्यकीय सेवांमुळेच पशुधन सुरक्षित.उष्णलहरींच्या तीव्र काळात (सकाळी ११ ते सायंकाळी ४) पशुधनाला विश्रांती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गोठ्याचे छत उष्णतारोधक ठेवणे, छतावर गवत किंवा पालापाचोळा टाकून पाणी मारणे, तसेच शक्य असल्यास स्प्रिंकलरचा वापर करणे उपयुक्त ठरेल. खिडक्यांना सावलीची व्यवस्था करावी. उष्णलहरी सुरू होण्यापूर्वी घटसर्प, फऱ्या आणि आंत्रविषार यांसारख्या रोगांवर प्रतिबंधक लसीकरण व जंतनाशक औषधांचा वापर करावा, असेही विभागाने स्पष्ट केले आहे..Women Veterinary Sector: महिलांसाठी पशुवैद्यकीय क्षेत्रातील नवी क्षितिजे.तातडीच्या उपाययोजना व उपचारउष्माघाताची लक्षणे (धापा टाकणे, लाळ गळणे, अस्वस्थता) दिसल्यास पशुधनाला त्वरित सावलीत हलवावे. थंड पाण्याचा शिडकावा करावा (अश्ववर्गीय प्राण्यांमध्ये पायापासून वरच्या भागाकडे). तातडीने पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा.विभागाने सर्व दवाखान्यांमध्ये आवश्यक औषधसाठा उपलब्ध करून ठेवला असून, फिरती पशुवैद्यकीय पथके तैनात केली आहेत..‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी विभागाच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करावे. कोणत्याही मदतीसाठी स्थानिक पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा. ‘१९६२’ कॉल सेंटरद्वारेही मार्गदर्शन उपलब्ध आहे.डॉ. किरण पाटील, आयुक्त, पशुसंवर्धन विभाग.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.