Animal Husbandry : नाशिक पशुस्वास्थ्य व रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत लाळ्याखुरकूत (एफएमडी) प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या नवव्या फेरीस नाशिक जिल्ह्यात प्रारंभ झाला. या फेरीसाठी जिल्ह्याला ७ लाख ६३ हजार ३५० एफएमडी लसमात्रा प्राप्त झाल्या असून, संपूर्ण जिल्ह्यात २९ सप्टेंबरपर्यंत लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. पशुधनाचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी आणि लाळखुरकूत रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पशुपालकांनी लसीकरण मोहिमेस सहकार्य करावे, असे आवाहन पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागाचे जिल्हा उपआयुक्त डॉ. सदाशिव बेडक्याळे यांनी केले..जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला. नाशिक तालुक्यातील विल्होळी येथील जीवदया ट्रस्टच्या गोशाळेतील जनावरांना पहिला डोस देऊन जिल्हा उपआयुक्त डॉ. सदाशिव बेडक्याळे यांच्या हस्ते मोहिमेस प्रारंभ झाला. यावेळी गोशाळेचे विश्वस्त तसेच पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते..Livestock Vaccination Campaign: ‘लाळ्या खुरकूत’ प्रतिबंधक लसीकरण मोहीम १३ ऑगस्टपासून.लाळ्याखुरकूत हा पशुधनामध्ये आढळणारा संसर्गजन्य रोग असून, त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक लसीकरण अत्यंत महत्त्वाचे आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व पात्र पशुधनाचे निर्धारित कालावधीत लसीकरण पूर्ण करण्याचे नियोजन पशुसंवर्धन विभागाने केले आहे. प्रत्येक पशुपालकाने आपल्या पशुधनाचे लसीकरण कार्यक्षेत्रातील पशुवैद्यक अथवा नोंदणीकृत लसीकरणकर्त्यामार्फत करून घ्यावे..FMD Vaccination: लाळ खुरकूत लसीकरणाच्या नवव्या मोहिमेला प्रारंभ.लसीकरण झालेल्या पशुधनाच्या नोंदी भारत पशुधन प्रणालीवर १०० टक्के अद्ययावत करण्याची कार्यवाही विभागामार्फत करण्यात येत आहे. लसीकरणानंतर संबंधित पशुवैद्यक किंवा नोंदणीकृत लसीकरणकर्त्याकडून पशुधनाच्या लसीकरणाची नोंद प्रणालीवर करण्यात येणार आहे..जिल्ह्यातील सर्व पशुपालकांनी मोहिमेच्या कालावधीत आपल्या पशुधनाचे लसीकरण करून घेऊन लाळखुरकूत रोगाच्या नियंत्रणासाठी पशुसंवर्धन विभागास सहकार्य करावे, असे आवाहन डॉ. बेडक्याळे यांनी केले..लाळखुरकूत लसीकरण मोहीमलसीकरणाचा कालावधी : १३ ऑगस्ट ते २९ सप्टेंबर २०२६प्राप्त लसमात्रा : ७ लाख ६३ हजार ३५०लसीकरणाचे उद्दिष्ट : जिल्ह्यातील सर्व पात्र पशुधनलसीकरणाची नोंद : भारत पशुधन प्रणालीवर १०० टक्के नोंदपशुपालकांसाठी आवाहन : कार्यक्षेत्रातील पशुवैद्यक अथवा नोंदणीकृत लसीकरणकर्त्यामार्फत पशुधनाचे लसीकरण करून घ्यावे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.