Thane News: ग्रामीण भागातील शेतकऱ्यांकडे असलेल्या पशुधनाची संख्या गेल्या काही वर्षांत सातत्याने कमी होत आहे. पशुधनातील ही घट केवळ शेतकऱ्यांसाठीच नव्हे तर शेतीव्यवस्था आणि दुग्ध उद्योगासाठीही धोक्याचा इशारा असल्याचे चित्र समोर येत आहे. भविष्यात सेंद्रिय खताचा तुटवडा, स्थानिक दूध उत्पादनात घट आणि त्याऐवजी आयात केलेल्या दूध पावडरचा वापर वाढण्याच्या शक्यतेमुळे परिस्थिती गंभीर बनत चालली आहे..मुंबईच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या ठाणे आणि पालघर जिल्ह्यांत पूर्वी कोटींच्या संख्येत पशुधन होते. येथून दररोज लाखो लिटर दूध मुंबई बाजारपेठेत पाठवले जात असे. स्थानिक शेतीतही गाई-म्हशींपासून मिळणाऱ्या शेणखताच्या वापरामुळे उत्पादनात वाढ झाली होती. विशेषतः वाडा कोलम भाताला सेंद्रिय खतामुळेच प्रसिद्धी मिळाली होती..Animal Vaccination : खानदेशात पशुधन लसीकरण संथच.दर पाच वर्षांनी करण्यात येणाऱ्या सरकारी पशुगणनेत पशुधनातील घट स्पष्टपणे दिसून येते. २०१७-१८ च्या पशुगणनेनुसार जिल्ह्यात तीन लाख ९६ हजार पशुधन होते, तर २०२०-२१ च्या गणनेत ही संख्या घटून तीन लाख ८६ हजार ३७ वर आली. म्हणजे केवळ पाच वर्षांत ८७ हजारांहून अधिक पशुधनाने घट झाली. अद्याप २०२३-२४ ची पशुगणना पूर्ण झालेली नसली, तरी प्राथमिक आकडेवारीनुसार यंदाही पशुधनातील घट चिंताजनक आहे.दुधाळ जनावरांच्या वाढलेल्या किंमती व वाढलेले खाद्याचे दरयामुळे दुधाचा व्यवसाय शेतकऱ्यांसाठी फायदेशीर राहिलेला नाही. यामुळे दुधाळ जनावरांची संख्या कमी झाली, असे शेतकऱ्यांनी सांगितले..Animal Vaccination : नाशिक जिल्ह्यात लाळ खुरकूत लसीकरण मोहीम पुर्ववत.९८ टक्के गायरानावर अतिक्रमणब्रिटिशकाळात गावांच्या एकूण क्षेत्रापैकी १० टक्के जमीन गायरान (गुरे चारण्यासाठी राखीव) म्हणून ठेवण्यात आली होती. परंतु गेल्या ७५ वर्षांत या गायरान जमिनीवर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाले असून आता फक्त २ टक्के क्षेत्र शिल्लक आहे.गावठाण क्षेत्र उपलब्ध नसल्याने अनेक गावांत नव्या वसाहती गायरान जमिनीवरच वाढत असून याचा पशुपालनावर थेट परिणाम होत आहे..दूध व्यवसाय तोट्यातदुधाळ जनावरांच्या किमतीत झालेली प्रचंड वाढ, खाद्याचे वाढते दर यामुळे दूध व्यवसाय तोट्यात जात आहे. परिणामतः शेतकरी दुधाळ जनावरे कमी करू लागले आहेत, अशी प्रतिक्रिया अकलोलीचे शेतकरी हिरामण पाटील यांनी दिली..सांभाळणे कठीणवाढत्या शहरीकरणामुळे आणि चराऊ क्षेत्राच्या घटामुळे अनेकांनी पशुधन सांभाळणे कमी केले आहे.शेतीचे वाढते यांत्रिकीकरण, बैलगाड्या-लाकडी नांगर कालबाह्य होणे आणि रोजगार-व्यवसायाकडे वाढता कल यामुळेही पशुधनाची संख्या घसरत आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.