Animal Husbandry Insurance Scheme: पशुधनाला विविध आजार, अपघात तसेच नैसर्गिक आपत्तींपासून संरक्षण मिळावे, या उद्देशाने केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत ‘पशुधन विमा योजना’ राबविण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. या योजनेमुळे पूर, वीज पडणे, अपघात, विषबाधा किंवा इतर कारणांमुळे पशुधनाचा अनैसर्गिक मृत्यू झाल्यास पशुपालक आणि शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण मिळणार आहे..या योजनेअंतर्गत विमा हप्त्याच्या एकूण रकमेपैकी ८५ टक्के हिस्सा केंद्र व राज्य शासन उचलणार असून, लाभार्थी पशुपालकाला केवळ १५ टक्के हिस्सा भरावा लागणार आहे, अशी माहिती पशुसंवर्धन आयुक्त डॉ. किरण पाटील यांनी दिली. योजनेच्या अंमलबजावणीसाठी निविदा प्रक्रियेद्वारे ‘ॲग्रिकल्चर इन्श्युरन्स कंपनी ऑफ इंडिया लिमिटेड’ची निवड करण्यात आली आहे. विमा प्रीमियमचे दर एक वर्षासाठी ४.३० टक्के, दोन वर्षांसाठी ७.५० टक्के आणि तीन वर्षांसाठी १०.५० टक्के निश्चित करण्यात आले असून, लाभार्थीला त्यापैकी केवळ १५ टक्के प्रीमियम भरावा लागणार आहे..Livestock Loan Scheme: पशुपालकांना ३ लाखांपर्यंत विनातारण बिनव्याजी कर्ज.‘नो टॅग, नो क्लेम’ नियम लागूया योजनेत पारदर्शकता आणि तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार असून, विमा मिळविण्यासाठी पशुधनाची ‘भारत पशुधन प्रणाली’वर १२ अंकी कानातील बिल्ल्यासह नोंदणी असणे बंधनकारक आहे. ‘नो टॅग, नो क्लेम’ या नियमाचे काटेकोर पालन करण्यात येणार आहे..‘डीबीटी’द्वारे १५ दिवसांत क्लेमपशुधनाचा मृत्यू झाल्यास २४ तासांच्या आत नोंदणीकृत संपर्क माध्यमाद्वारे विमा कंपनीला माहिती देणे आवश्यक आहे. आवश्यक कागदपत्रे आणि शवविच्छेदन (पोस्टमॉर्टेम) अहवाल सादर केल्यानंतर १५ दिवसांच्या आत विम्याची रक्कम थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यात डीबीटीद्वारे जमा करण्यात येणार आहे. पात्र विमा दाव्याची मुदतीत भरपाई न केल्यास विमा कंपनीला १२ टक्के दराने व्याज द्यावे लागणार आहे. राज्यात या योजनेची अंमलबजावणी ‘महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ, नागपूर’मार्फत करण्यात येणार असून, राज्यस्तरावर पशुसंवर्धन आयुक्त या योजनेचे सनियंत्रण करतील, अशी माहिती मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शीतलकुमार मुकणे यांनी दिली..Livestock Insurance: केंद्र सरकार काढणार दुधाळ पशुधनाचा विमा.विमा संरक्षणाची मर्यादाएका कुटुंबातील कमाल १० पशुधनांचा विमा.दुभती गाय : कमाल ७० हजार रुपयांपर्यंत विमा संरक्षण.दुभती म्हैस : कमाल ८० हजार रुपयांपर्यंत विमा संरक्षण.बैल : कमाल ७० हजार रुपये.रेडा : कमाल ८० हजार रुपये.शेळी व मेंढी : प्रत्येकी कमाल ७ हजार रुपयांपर्यंत विमा संरक्षण..केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत ‘पशुधन विमा योजना’ राज्यात प्रभावीपणे राबविण्यास प्रशासकीय व वित्तीय मान्यता मिळणे हा राज्यातील लाखो पशुपालकांसाठी अत्यंत दिलासादायक आणि महत्त्वाचा निर्णय आहे. या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा आणि आपले पशुधन सुरक्षित करावे.पंकजा मुंडे, पशुसंवर्धनमंत्री.महाराष्ट्र पशुधन विकास मंडळामार्फत या विमा योजनेची अंमलबजावणी अत्यंत पारदर्शक आणि गतीने केली जाईल. राज्यातील सर्व पशुपालक व शेतकरी बांधवांनी ‘भारत पशुधन प्रणाली’वर वेळेत नोंदणी करून या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. डॉ. किरण पाटील, पशुसंवर्धन आयुक्त.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.