Nanded News: माळेगाव यात्रेत लालकंधारी नर गटात परसराम नागनाथ सापनर (लिंबोटी, ता. लोहा) यांनी चॅम्पियनशिप मिळवली. लालकंधारी कालवड गटात परमेश्वर प्रभाकर केंद्रे (कुनकी, ता. जळकोट) यांना प्रथम क्रमांकाचा मान मिळाला. या पशुपालकांना प्रत्येकी एक लाख २१ हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात आले. .माळेगाव येथील यात्रोत्सव २०२५-२६ निमित्त शुक्रवारी (ता. १९) आयोजित भव्य पशुप्रदर्शनाला पशुपालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी भेट देऊन पशुप्रदर्शनाची पाहणी केली..Dairy Exhibition: इंडियन डेअरी असोसिएशनचे फेब्रुवारीत नवी दिल्लीत प्रदर्शन.यावेळी पशुसंवर्धन विभागाच्या अतिरिक्त आयुक्त डॉ. शितल मुकणे उपस्थित होते. या प्रदर्शनात देशी व संकरित गायी, बैल, कालवड, वासरे तसेच दुभत्या जनावरांचे विविध गटांत परीक्षण करून उत्कृष्ट पशुपालकांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. देवणी नर गटात अदात, दोन दात, चार दात व वासरे या गटांत स्पर्धा पार पडल्या..देवणी दोन दात गटात रजाकअली उस्मानअली पटेल (नेत्रगाव, ता. उदगीर) यांनी चॅम्पियनशिप पटकावली. देवणी कालवड गटात बालाजी मारोती केंद्रे (कुनकी, ता. जळकोट) यांना चॅम्पियन घोषित करण्यात आले. या पशुपालकांना प्रत्येकी ७१ हजारांचे बक्षीस देण्यात आले. लालकंधारी गटात देखील चुरशीच्या स्पर्धा झाल्या..Animal Competition : मांजरमचा लाल कंधारी वळू, हासूळची गाय ठरली चॅम्पियन!.चार दात व त्यावरील नर गटात परसराम नागनाथ सापनर (लिंबोटी, ता. लोहा) यांनी चॅम्पयनशिप मिळवली. लालकंधारी कालवड गटात परमेश्वर प्रभाकर केंद्रे (कुनकी, ता. जळकोट) यांना प्रथम क्रमांकाचा मान मिळाला. या पशुपालकांना प्रत्येकी एक लाख २१ हजार रुपयांचे बक्षीस देण्यात आले. गाय गट, नर व मादी वासरे (सहा महिने ते एक वर्ष) या गटांतही उत्कृष्ट जनावरांची निवड करण्यात आली..लालकंधारी अदात वळू गटात लिंबोटी (ता. लोहा) येथील सुशील सापनर यांच्या वळूला पहिले ५१ हजाराचे बक्षीस देण्यात आले. तर दोन दात वळू गटात शाहापूर (ता. देगलूर) येथील सुधाकर जडलवार यांच्या वळू प्रथम ठरला. त्यांना ५१ हजाराचे बक्षीस देण्यात आले. यावेळी विजेत्या पशुपालकांना रोख बक्षिसे, प्रमाणपत्रे व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. या पशुप्रदर्शनामुळे स्थानिक पशुपालकांना उत्तम जनावरांच्या संगोपनाबाबत मार्गदर्शन मिळाले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.