Chh. Sambhajinagar News : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ अंतर्गत सिल्लोड तालुक्यातील लिहाखेडी येथे मंजूर करण्यात आलेल्या कृषी महाविद्यालयाला अजूनही इमारती बांधकामासाठी निधी, पद मान्यतेची प्रतीक्षा आहे. अशातच विद्यापीठाच्या कुलगुरूंनी प्रत्यक्ष स्थळ पाहणी केल्याने आता आता तरी कृषी महाविद्यालय कार्यान्वित होण्यास गती मिळेल, अशी आशा आहे..या संदर्भात अधिक माहितीनुसार, ऑक्टोबर २०२३ मध्ये ठाणा (ता. सोयगाव) येथे कृषी महाविद्यालय स्थापन करण्यास मान्यता प्रदान केली होती. परंतु तेथील जमीन ही राखीव वन संरक्षित असल्यामुळे ऑक्टोबर २०२४ मध्ये ते महाविद्यालय लिहाखेडी व पालोद (ता. सिल्लोड) येथील शासकीय जमिनीवर कृषी महाविद्यालय स्थापन करण्यास मान्यता दिली होती. .त्यानुसार जिल्हाधिकारी यांनी लिहाखेडी येथील गट क्रमांक ४५१ मधील १२.२७ हेक्टर आर., गट क्रमांक ४५२ मधील ९.४६ हेक्टर आर., गट क्रमांक ४५५ मधील ८.४१ हेक्टर आर. तसेच गट क्रमांक ४५५/१ मधील ०.२२ हेक्टर आर. अशी एकूण हेक्टर ३०.३६ हे. आर तसेच पालोद येथील घटक क्रमांक ८२ मधील १४.५७ हेक्टर शासकीय गायरान जमीन कृषी महाविद्यालय स्थापन करण्यासाठी महसूल मुक्त किमतीने अटी व शर्तीच्या अधीन राहून मान्यता प्रदान केली होती..Agriculture Colleges : रिक्त पदांमुळेच कृषी विद्यापीठांची दुरवस्था .त्यानंतर महाविद्यालयीन इमारत, मुलांचे, मुलींचे वसतिगृह, ग्रंथालय इमारत, सभागृह, विश्रामगृह विविध विभागांच्या इमारती, निवासस्थानी आदींसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता यांच्याकडून सुमारे २९८.८५ कोटी रुपयांची तांत्रिक सहमती प्राप्त करून घेण्यात आली. .त्यामुळे आता बांधकामासाठी निधीसाठी शासन निर्णय तसेच महाविद्यालयासाठी पद मान्यतेकरता तत्काळ निर्णय होणे अपेक्षित आहे. जिरेवाडी येथील मंजूर महाविद्यालयाची ही स्थिती आहे. त्यासाठी विद्यापीठ शासन व महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या माध्यमातून पाठपुराव्याची गरज व्यक्त होत आहे. .Agriculture Colleges Accreditation: कृषी महाविद्यालयांना ‘अॅक्रिडेशन’ची सक्ती करा.कुलगुरूंनी केली जागेची पाहणीवसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ अंतर्गत लिहाखेडी, पालोद (ता. सिल्लोड) येथील शासकीय कृषी महाविद्यालयासाठीच्या जागेची पाहणी केली. या दौऱ्यात कृषी महविद्यालयासंदर्भात तसेच मका संशोधन केंद्रासाठी निधी व जागेचा प्रश्न आदीं विषयी माजी कृषिमंत्री व आमदार अब्दुल सत्तार यांच्या समवेत चर्चा केली. यावेळी पदनिर्मिती, कृषी महाविद्यालय करिता नवीन इमारतीचे बांधकाम व इतर अनुषंगाने सविस्तर चर्चा केली. विद्यापीठ कार्यकारी परिषद सदस्य दिलीप देशमुख, सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य डॉ. सूर्यकांत पवार, तालुका कृषी अधिकारी रामदास पाटील हे या वेळी उपस्थित होते..छत्रपती संभाजीनगर कृषी महाविद्यालयाला निधीची ‘घरघर’माहितीनुसार, सद्यःस्थितीत छत्रपती संभाजीनगर येथील राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पाच्या परिसरात तात्पुरत्या स्वरूपात महाविद्यालय सुरू आहे. गत शैक्षणिक वर्षात मान्यता मिळालेल्या ६० विद्यार्थ्यांच्या तुलनेत ५६ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला. त्यासाठी आकस्मिक निधीची गरज असताना तोही प्राप्त नाही.यंदा प्रवेशाची प्रक्रिया सुरू आहे हे विशेष. सुमारे ८४ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची आवश्यकता या महाविद्यालयाला असणार आहे. परंतु अजूनही त्याला पद मान्यता मिळाली नाही..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.