Agriculture Tips: महाराष्ट्रावर आज (ता. २४) व उद्या (ता. २५) हवेचे दाब १००४ हेप्टापास्कल इतके राहतील. त्यामुळे बराच काळ पावसात उघडीप राहण्यासह तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता राहील. मंगळवारी (ता. २६) हवेचे दाब १००२ ते १००४ हेप्टापास्कल इतके होताच, हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होऊन तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता निर्माण होईल. बुधवारी (ता. २७) पुन्हा १००४ ते १००६ हेप्टापास्कल हवेचा दाब होताच, पावसात उघडीप व तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता निर्माण होईल. मात्र गुरुवारी (ता.२८) हवेचे दाब १००६ ते १००८ हेप्टापास्कलपर्यंत पुन्हा वाढतील. त्यामुळे बराच काळ पावसात उघडीप राहील. शुक्रवारी व शनिवारी (ता.२९ व ३०) उत्तरेस १००४ हेप्टापास्कल, मध्यावर १००६ हेप्टापास्कल व दक्षिणेस १००८ हेप्टापास्कल इतके हवेचे दाब होताच बराच काळ उघडीप, तर क्वचित वेळा अल्प पावसाची शक्यता निर्माण होईल. अशा प्रकारे या आठवड्यात पावसाचे प्रमाण कमी राहील. .या आठवड्यात आकाश अंशतः ढगाळ राहील. महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील. रायगड, ठाणे, पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, हिंगोली, जालना, छत्रपती संभाजीनगर, बुलडाणा, वाशीम, यवतमाळ, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे व अहिल्यानगर जिल्ह्यांत वाऱ्याचा ताशी वेग १६ ते २१ कि.मी. राहील. त्यामुळे बाष्पीभवनाचा वेग वाढेल. त्यामुळे शेतात वापसा येण्यास मदत होईल. सकाळची व दुपारची सापेक्ष आर्द्रता चांगली राहील..प्रशांत महासागराच्या विषुववृत्तीय भागातील पेरूजवळ पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान १५ अंश सेल्सिअस, तर इक्वॅडोरजवळ ते २१ अंश सेल्सिअस राहील. त्यामुळे तेथील हवेचे दाब वाढतील व हिंदी महासागरावरील वारे तिकडे जाऊ शकणार नाहीत. त्यामुळे यंदा मॉन्सूनचा कालावधी ऑक्टोबर महिन्याच्या अखेरपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. आगामी काळात महाराष्ट्रासह भारतात चांगल्या पावसाची शक्यता राहील. मात्र पावसात उघडीप आणि त्यानंतर हवेचे दाब कमी होतील त्याच ठिकाणी पाऊस होईल. त्यानुसार शेती कामांचे नियोजन करणे गरजेचे राहील..Monsoon Rainfall 2025: कोकण, घाटमाथ्यावर पावसाचा अंदाज; विदर्भात दोन दिवस जोरदार पावसाची शक्यता.कोकणआज (ता.२४) सिंधुदुर्ग व ठाणे जिल्ह्यांत १७ ते १८ मि.मी., तर रत्नागिरी, रायगड व पालघर जिल्ह्यांत २० ते २२ मि.मी. पावसाची शक्यता आहे. कोकणातील सर्वच जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग सिंधुदुर्ग जिल्ह्यात ताशी ९ कि.मी., तर रत्नागिरी जिल्ह्यात ताशी १३ कि.मी. राहील. रायगड व ठाणे जिल्ह्यांत वाऱ्याचा ताशी वेग १७ ते १८ कि.मी. आणि पालघर जिल्ह्यात ताशी २२ कि.मी. राहील. सर्वच जिल्ह्यात कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस राहील. सिंधुदुर्ग, रत्नागिरी व ठाणे जिल्ह्यांत किमान तापमान २४ अंश सेल्सिअस, तर रायगड व पालघर जिल्ह्यांत २५ अंश सेल्सिअस राहील. सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत आकाश पूर्णतः ढगाळ, तर रायगड, ठाणे व पालघर जिल्ह्यांत अंशतः ढगाळ राहील. सर्वच जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ९० ते ९३ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ८२ ते ८८ टक्के राहील..उत्तर महाराष्ट्रआज (ता.२४) धुळे, नाशिक व जळगाव जिल्ह्यांत ३ ते ५ मि.मी., तर नंदुरबार जिल्ह्यात ९ मि.मी. पावसाची शक्यता आहे. सर्वच जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग जळगाव जिल्ह्यात ताशी १५ कि.मी., तर धुळे जिल्ह्यात ताशी १९ कि.मी. राहील. नंदुरबार जिल्ह्यात वाऱ्याचा ताशी वेग २० कि.मी., तर नाशिक जिल्ह्यात ताशी वेग २५ कि.मी. राहील. कमाल तापमान नाशिक जिल्ह्यात २९ अंश सेल्सिअस, तर धुळे, नंदुरबार व जळगाव जिल्ह्यांत ३१ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान नाशिक जिल्ह्यात २२ अंश सेल्सिअस, तर जळगाव जिल्ह्यात २३ अंश सेल्सिअस आणि नंदुरबार जिल्ह्यात २४ अंश सेल्सिअस राहील. सर्वच जिल्ह्यात आकाश पूर्णतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता धुळे, नंदुरबार व जळगाव जिल्ह्यांत ८४ ते ८७ टक्के, तर नाशिक जिल्ह्यात ९६ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता जळगाव जिल्ह्यात ६७ टक्के, तर धुळे जिल्ह्यात ७४ टक्के राहील. नाशिक व नंदुरबार जिल्ह्यांत दुपारची सापेक्ष आर्द्रता ८१ ते ८८ टक्के राहील..मराठवाडाआज (ता.२४) धाराशिव, लातूर, नांदेड, बीड, परभणी, हिंगोली, जालना व छत्रपती संभाजीनगर या सर्वच जिल्ह्यांत ३ ते ४ मि.मी. अल्पशा हलक्या पावसाची शक्यता राहील. तर बराच काळ पावसात उघडीप राहणे शक्य आहे. सर्वच जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा नैऋत्येकडून राहील. परभणी, नांदेड व हिंगोली जिल्ह्यांत वाऱ्याचा ताशी वेग १६ कि.मी. राहील. वाऱ्याचा ताशी वेग जालना जिल्ह्यात १७ कि.मी., तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत ताशी १८ कि.मी. राहील. धाराशिव जिल्ह्यात वाऱ्याचा ताशी वेग २० कि.मी., तर लातूर व बीड जिल्ह्यांत ताशी २१ कि.मी. राहील. कमाल तापमान लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली व जालना जिल्ह्यांत २८ अंश सेल्सिअस, तर बीड व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत २९ अंश सेल्सिअस राहील. धाराशिव जिल्ह्यात कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान धाराशिव जिल्ह्यात २१ अंश सेल्सिअस, तर नांदेड, बीड, हिंगोली, जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत २२ अंश सेल्सिअस राहील. लातूर जिल्ह्यात किमान तापमान २३ अंश सेल्सिअस, तर परभणी जिल्ह्यात २४ अंश सेल्सिअस राहील. सर्वच जिल्ह्यात आज (ता.२४) आकाश पूर्णतः ढगाळ राहील. धाराशिव, लातूर व नांदेड जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ९० टक्के राहील. बीड, परभणी, हिंगोली, जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ८८ टक्के राहील. सर्वच जिल्ह्यात दुपारची सापेक्ष आर्द्रता ८१ ते ८७ टक्के राहील..पश्चिम विदर्भआज (ता.२४) बुलडाणा, अकोला व वाशीम जिल्ह्यांत ३ ते ४ मि.मी., तर अमरावती जिल्ह्यात ७ मि.मी. पावसाची शक्यता आहे. सर्वच जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा नैऋत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग अकोला व अमरावती जिल्ह्यांत ताशी १३ ते १४ कि.मी., तर बुलडाणा व वाशीम जिल्ह्यांत ताशी १६ ते १८ कि.मी. राहील. कमाल तापमान वाशीम जिल्ह्यात २८ अंश सेल्सिअस, तर बुलडाणा व अमरावती जिल्ह्यांत २९ अंश सेल्सिअस आणि अकोला जिल्ह्यात ३० अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यांत २३ अंश सेल्सिअस राहील. आकाश पूर्णतः ढगाळ राहील. सर्वच जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ८६ ते ९० टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ६७ ते ७१ टक्के राहील..Maharashtra Rain: विदर्भात विजांसह पावसाची शक्यता.मध्य विदर्भआज (ता.२४) यवतमाळ जिल्ह्यात ३ मि.मी., वर्धा जिल्ह्यात ८ मि.मी. व नागपूर जिल्ह्यात ११ मि.मी. पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा सर्वच जिल्ह्यांत नैऋत्येकडून राहील. सर्वच जिल्ह्यात वाऱ्याचा ताशी वेग १४ ते १६ कि.मी. राहील. कमाल तापमान वर्धा जिल्ह्यात २८ अंश सेल्सिअस, तर यवतमाळ व नागपूर जिल्ह्यांत २९ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान नागपूर जिल्ह्यात २३ अंश सेल्सिअस, तर यवतमाळ व वर्धा जिल्ह्यांत २४ अंश सेल्सिअस राहील. आकाश ढगाळ राहील. सर्वच जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ८६ ते ९० टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ७१ ते ७६ टक्के राहील..पूर्व विदर्भआज (ता.२४) चंद्रपूर जिल्ह्यात ५ मि.मी., तर गडचिरोली व भंडारा जिल्ह्यांत ११ ते १२ मि.मी. आणि गोंदिया जिल्ह्यात १६ मि.मी. पावसाची शक्यता आहे. सर्वच जिल्ह्यात वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग गडचिरोली जिल्ह्यात ७ कि.मी., तर चंद्रपूर व गोंदिया जिल्ह्यांत ताशी ११ ते १२ कि.मी आणि भंडारा जिल्ह्यात ताशी १३ कि.मी. राहील. सर्वच जिल्ह्यात कमाल तापमान २९ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २४ अंश सेल्सिअस राहील. सर्वच जिल्ह्यात आकाश पूर्णतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता चंद्रपूर जिल्ह्यात ८८ टक्के, तर गडचिरोली भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांत ९२ ते ९४ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता चंद्रपूर, गडचिरोली व भंडारा जिल्ह्यांत ७५ ते ७९ टक्के, तर गोंदिया जिल्ह्यात ८१ टक्के राहील..पश्चिम महाराष्ट्रआज (ता.२४) अहिल्यानगर व सांगली जिल्ह्यांत २ मि.मी., तर कोल्हापूर जिल्ह्यात ६ मि.मी. पावसाची शक्यता आहे. मात्र सातारा व पुणे जिल्ह्यांत आज १२ ते १४ मि.मी. पावसाची शक्यता आहे. सर्वच जिल्ह्यात वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग कोल्हापूर जिल्ह्यात ताशी १४ कि.मी., सातारा जिल्ह्यात ताशी १८ कि.मी., तर सोलापूर व पुणे जिल्ह्यांत ताशी १९ कि.मी. राहील. सांगली जिल्ह्यात मात्र वाऱ्याचा ताशी वेग २१ कि.मी. इतका अधिक राहील. कमाल तापमान सातारा जिल्ह्यात २७ अंश सेल्सिअस, तर कोल्हापूर व सोलापूर जिल्ह्यांत २८ अंश सेल्सिअस राहील. सांगली जिल्ह्यात कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस, तर पुणे व अहिल्यानगर जिल्ह्यांत ३१ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सातारा जिल्ह्यात २२ अंश सेल्सिअस, तर कोल्हापूर, सांगली, सोलापूर, पुणे व अहिल्यानगर जिल्ह्यांत २३ अंश सेल्सिअस राहील. सर्वच जिल्ह्यांत आकाश पूर्णतः ढगाळ राहील. सोलापूर, पुणे व अहिल्यानगर जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ८६ ते ८८ टक्के, तर कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांत ९० ते ९४ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता सर्वच जिल्ह्यांत ६५ ते ८२ टक्के राहील..कृषी सल्लाशेतात साचलेल्या पाण्याचा उताराकडील बांधाच्या कोपऱ्यात चर काढून निचरा करावा.शेतात पावसाची पाणी साचून राहिल्यामुळे पिके कुजण्याची शक्यता असते. असे पीक अवशेष शेताबाहेर काढून शेत मोकळे करावे.रासायनिक कीटकनाशक किंवा बुरशीनाशक फवारणीवेळी द्रावणामध्ये स्टिकरसारखा चिकट पदार्थ मिसळावा.भात खाचरात बांधबंदिस्ती करून घ्यावी.(ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ, सदस्य, ॲग्रिकल्चर मेटरॉलॉजी फोरम फॉर साउथ आशिया).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.