Parbhani News: रब्बी हंगामात शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण कृषी निविष्ठा उपलब्ध राहाव्यात तसेच साठेबाजी, जादा दराने विक्री आणि जबरदस्तीने इतर निविष्ठांची खरेदी लादणे यासारख्या गैरव्यवहारांना आळा घालण्यासाठी कृषी विभागाच्या भरारी पथकांमार्फत तपासणी मोहीम राबविण्यात आली. यावेळी अनियमिता आढळून आलेल्या गंगाखेड तालुक्यातील ४ कृषी केंद्रांचे निविष्ठा विक्री परवाने निलंबित करण्यात आले..जिल्ह्यात निरीक्षके व भरारी पथकांनी केलेल्या तपासणीच्या अनुषंगाने गुरुवारी (ता. ४) जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी दौलत चव्हाण यांचे दालनात सुनावणी आयोजित करण्यात आली होती..Revenue Department : महसूल मंत्र्यांच्या छाप्यानंतर उपनिबंधक कपले निलंबित .यावेळी जिल्ह्यातील ४ कीटकनाशके, ३ रासायनिक खते, ३ बी-बियाणे परवाने निलंबित करण्यात आलेले आहेत. ग्राहकांना योग्य दराने रासायनिक खत आणि कीटकनाशके मिळावे, साठा व विक्री यामध्ये पारदर्शकता राखावी, असे निर्देश जिल्हा कृषी विभागामार्फत देण्यात आले आहेत..जिल्ह्यातील सर्व कृषी निविष्ठा विक्रेते यांनी शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण व दर्जेदार कृषी निविष्ठांची विक्री करावी, साठेबाजी करू नये. जादा दराने कुठलीही निविष्ठा विक्री करू नये अन्यथा तत्काळ कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल, असा इशारा जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी चव्हाण यांनी दिला आहे..Fertilizer Scam Rajura : कृषी केंद्रांचे परवाने निलंबित.या कृषी केंद्रावर केली कारवाईत्यात मे. शिवशंकर कृषी केंद्र (धारासूर, ता. गंगाखेड), निविष्ठाचा प्रकार -बियाणे,रासायनिक खत,कीटकनाशके (निलंबन कालावधी -१ महिना), मे. साई कृषी सेवा केंद्र (धारासूर, ता. गंगाखेड) बी-बियाणे, रासायनिक खत, कीटकनाशके (एक महिना), मे.विनायक कृषी सेवा केंद्र (गंगाखेड), कीटकनाशके (७ दिवस),.मे.राधाकृष्ण कृषी सेवा केंद्र, (माखणी ता. गंगाखेड) बी-बियाणे, रासायनिक खत (७ दिवस) व कीटकनाशके (निलंबन कालावधी १ महिना) या सर्व विक्रेत्यांनी परवाना नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. अन्यथा, तात्पुरत्या निलंबनानंतर कायमस्वरूपी परवाना रद्द करण्याची कारवाई केली जाईल..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.