Ahilyanagar News: अहिल्यानगर जिल्ह्यात रब्बी हंगामामध्ये शेतकऱ्यांना खते, बियाणे, कृषी निविष्ठा विक्री करताना लिंकिंग करणाऱ्या अकरा कृषी निविष्ठा विक्रेत्यांचे कृषी विभागाने परवाने निलंबित केले आहेत. तसेच निविष्ठा विक्रेत्यांनी शेतकऱ्यांवर दडपशाही केल्यास कठोर कारवाई करण्याचा इशारा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी दिला आहे..रब्बी हंगामात शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण कृषी निविष्ठांचा योग्य दरामध्ये पुरवठा होण्याच्या दृष्टीने तालुकास्तरीय गुणनियंत्रण निरीक्षक आणि भरारी पथक यांच्यामार्फत तपासणी मोहीम हाती घेण्यात आलेली आहे. .Agri Dealers Protest: कृषी निविष्ठा विक्रेत्यांचा बंद.पूर्ण तपासणी करून विविध निविष्ठांचे नमुने काढणे, खत विक्री व्यवहार नोंदी, जादा दराने खते विक्री, खतांची लिकिंग असे प्रकार आढळल्यास संबंधितांवर कृषी निविष्ठा विक्री कायदे व नियमांनुसार कारवाईच्या सूचना दिल्या आहेत. विक्री केंद्रांमध्ये त्रुटी तसेच नियमबाह्य गोष्टी आढळल्यास कडक कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिले आहेत..Fertilizer License Suspension: राज्यातील ८६ खत विक्रेत्यांचे परवाने निलंबित, आठ रद्द.युरिया खताची वाढती मागणी व युरिया विक्रीमध्ये होत असलेल्या गैरप्रकारांच्या तक्रारी कृषी विभागास प्राप्त झालेल्या होत्या. त्या रोखण्यासाठी तसेच ई-पॉसवरील खत साठा व गोदामातील प्रत्यक्ष साठा यामध्ये तफावत आढळून येत होती. त्यासाठी कृषी विभागाने जिल्हाभरात कृषी सेवा केंद्रांची तपासणी मोहीम व्यापक स्वरूपात राबविण्यात येत आहे..अहिल्यानगर जिल्ह्यात झालेल्या तपासणीमध्ये कृषी निविष्ठा कायदा, अत्यावश्यक अधिनियम तसेच परवाना अटी व नियमानुसार त्रुटी आढळलेल्या पाथर्डी तालुक्यातील ३ व कोपरगाव तालुक्यातील ८ अशा कृषी सेवा केंद्रांच्या ११ परवान्यांवर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात संबंधितांची सुनावणी घेऊन त्यांचे परवाने निलंबित केले आहेत..शेतकऱ्यांना युरिया व इतर खतांसोबत लिकिंग अथवा कृषी निविष्ठांच्या गुणवत्तेबाबत तक्रारी असल्यास नजीकच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालय किंवा कृषी विभागाच्या टोल फ्री क्रमांक १८००२३३४००० वर तसेच ९८२२४४६६५५ या क्रमांकावर तक्रार नोंदवावी.- सुधाकर बोराळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, अहिल्यानगर.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.