Nashik News : पर्यावरणाचा विचार करूनच नाशिकमधील सिंहस्थ कुंभमेळा साजरा करू, तपोवन वाचवू आणि पर्यावरणाचा समतोल राखू, या स्पष्ट शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निर्धार व्यक्त केला. .महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर शनिवारी (ता. १०) शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस व रिपब्लिकन सेना युतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत ते बोलत होते. या वेळी व्यासपीठावर शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, मंत्री नरहरी झिरवाळ, खासदार सुनील तटकरे, आमदार सुहास कांदे, आमदार हिरामण खोसकर, आमदार किशोर दराडे, नरेंद्र दराडे, माजी खासदार हेमंत गोडसे, समीर भुजबळ, मंजुळा गावित, अजय बोरस्ते, विलास शिंदे तसेच शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपब्लिकन सेना युतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नाशिककर बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते..Environment Protection: झाडे वाचविण्यासाठी पर्यावरणप्रेमी सरसावले !.श्री. शिंदे म्हणाले, ‘‘नाशिकचा कुंभमेळा देखील ऐतिहासिक होईल यासाठी काम करत आहोत. पुनर्निर्माण प्रकल्पांना ५० टक्के एफएसआय, पुण्याप्रमाणे ९ मीटर रुंदीच्या रस्त्यांवर ३० मीटर उंच इमारतींना परवानगी, एनएमआरडी हद्दीतील गावांसाठी ड्रेनेजसाठी निधी, सिडकोतील घरे फ्रीहोल्ड करणे, छत्रपती संभाजी स्टेडियमच्या रखडलेल्या कामासाठी तत्काळ निधी, सेंट्रल पार्क फेज-२साठी निधी, मुंबई नाका व शहरातील वाहतूक कोंडीवर ठोस उपाययोजना, बंद वाचनालये पुन्हा सुरू करणे, महाकवी कालिदास कलामंदिर व परशुराम साईखेडकर नाट्यगृहाला पुनर्वैभव प्राप्त करून देणे, अशी आश्वासने त्यांनी दिली..Environment Conservation : विठ्ठल भक्तांनी पर्यावरण संवर्धनाचा संदेश गावोगावी घेऊन जावा.शहराचा सर्वांगीण विकास साधायचा असून, त्यासाठी पायाभूत सुविधांचा भक्कम आराखडा राबविला जाणार आहे. हा विकास वेगाने व्हावा यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे हात बळकट करावेत, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केले..ठाकरे बंधूंवर टीका; भाजपवर टीका टाळलीनिवडणुका जवळ आल्या, की काहींना मतदारांची आठवण होते. मात्र पुढच्या तीस वर्षांत आपले काय होणार, या चिंतेने वीस वर्षांनंतर एकत्र आलेल्यांना जनतेची नव्हे, तर केवळ स्वतःच्या राजकारणाचीच काळजी असल्याची टीका श्री. शिंदे यांनी ठाकरे बंधूंवर केली. त्यांच्या टीकेचा रोख ठाकरे बंधूंवर होता; भाजपवर थेट टीका मात्र त्यांनी टाळली..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.