Nashik News: नाशिक जिल्ह्यात रोज कुठे ना कुठे बिबट्या दिसत असल्याच्या घटना निदर्शनास येतात. या बिबट्यांना पकडण्यासाठी वन विभाग विविध उपाययोजना राबवित आहेत. वन्यजीव व मानवी संघर्षांत पकडलेल्या बिबट्यांसह अनाथ बछडे, रस्ते अपघातात जखमी बिबट्यांसह वन्य प्राण्यांवर उपचारासाठी वनविभागाने नाशिकमधील म्हसरूळ येथे वन्यजीव उपचार केंद्र कार्यान्वित केले आहे. या केंद्रात सध्या १४ बिबट्यांसह अन्य लहान-मोठे वन्य प्राणी आहेत. वन्यजीव उपचार केंद्रात बिबट्यांवर औषधोपचार केले जात आहेत..वन विभागाच्या म्हसरूळ शिवारात असलेल्या या उपचार केंद्रात सध्या १४ बिबटे आहेत. त्यात नाशिक शहरासह जिल्हाभरात वन विभागाने पिंजरा लाऊन पकडलेल्या बिबट्यांचाही समावेश आहे. तसेच कोल्हे, लांडगे, तरससारखे अन्य वन्यप्राणी आहेत. या उपचार केंद्रात ‘रेस्क्यू’ या वन्यजीव क्षेत्रात कार्यरत स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून औषधोपचार आणि देखभाल केली जाते. .Leopard Rescue: पंधरवड्यापासून हुलकावणी देणारा बिबट्या अखेर जेरबंद.त्यासाठी राज्य शासनाच्या वन विभागाने वन्य प्राण्यांच्या संवर्धनाबाबत ‘रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्ट’ या स्वयंसेवी संस्थेबरोबर सामंजस्य करार केला आहे. या केंद्रात समृद्धी महामार्गालगत जखमी अवस्थेत सापडलेल्या बिबट्या मादीचे नामकरण ‘समृद्धी’ असे करण्यात आले आहे, तर आईपासून दुरावलेल्या मादी बछड्याचे नामकरण ‘परी’ असे करण्यात आले आहे. .या केंद्रात वन्य प्राण्यांवर औषधोपचारासाठी वन विभागासह ‘रेस्क्यू’चे सदस्य २४ तास तैनात असतात. या केंद्रात २ पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांसह अन्य कर्मचारी या प्राण्यांच्या आरोग्याची सतत काळजी घेतात. त्यांचा दैनंदिन आहार निश्चित असतो. या वन्य जीव उपचार केंद्रात अतिदक्षता विभाग, शल्यचिकित्सागृह आवश्यक त्या सुविधा कार्यान्वित केलेल्या आहे. वन विभागाच्या वन्यजीव उपचार केंद्राची जिल्हाधिकारी प्रसाद यांनी सकाळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी उपवनसंरक्षक राकेश सेपट (पूर्व) सिद्धेश सावर्डेकर (पश्चिम) यांच्यासह ‘रेस्क्यू’चे सदस्य उपस्थित होते..Leopard Rescue : बिबट्याच्या रेक्यूचा थरार ; ड्रोनच्या मदतीने अखेर सापडला जाळ्यात .बिबट्याचे अनाथ बछडे, जखमी बिबट्यांसह वन्यप्राणी वन विभागाच्या वन्यजीव उपचार केंद्रात आणले जातात. तेथे त्यांच्यावर औषधोपचार होऊन त्यांची देखभाल केली जाते. या उपचार केंद्राच्या विस्तारासाठी व आवश्यक सोईसुविधांसाठी जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून निश्चितच सहकार्य केले जाईल.- आयुष प्रसाद, जिल्हाधिकारी, नाशिक.वन विभागाने वन्यजीव उपचार केंद्र कार्यान्वित केले आहे. या उपचार केंद्रात ‘रेस्क्यू’ या संस्थेच्या मदतीने वन्यजीवांवर आवश्यक ते उपचार केले जातात.- सिद्धेश सावर्डेकर, उपवनसंरक्षक (पश्चिम), नाशिक.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.