Pune News: मागील १५ दिवसांपासून हुलकावणी देणारी बिबट मादी रविवार (ता.३०) रोजी सायंकाळी साडेसहा वाजता जेरबंद करण्यात अखेर वनविभागाला यश आले. निरगुडसर (ता.आंबेगाव) येथील नहयार मळा येथे सुनील भेके यांच्या घराजवळ लावलेल्या पिंजऱ्यात अडकलेली दोन वर्षे वयाची ही बिबट मादी माणिकडोह निवारा केंद्रात पाठवण्यात येणार असल्याची माहिती वनविभागाकडून देण्यात आली. .निरगुडसर परिसरात बिबट्याच्या रोज असलेल्या वास्तव्यामुळे निरगुडसर (ता.आंबेगाव) येथील नहयार मळा येथे सुनील भेके यांच्या घराजवळ १५ दिवसापूर्वी वनविभागाने पिंजरा लावला होता. पण, बिबट्या मात्र हुलकावणी देत होता. त्यामुळे येथील नागरिकांनी जागेत बदल करावा, अशी मागणी लावून धरली होती..Leopard Attack: दौंडजमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात गायीचा मृत्यू.अखेर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सहा दिवसांपूर्वी जागा बदलली आणि बिबट्या जेरबंद झाला. रविवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास सुनील भेके यांच्या उसाच्या शेतात बिबट्या बसलेला नागरिकांनी पाहिला होता. त्यानंतर बिबट मादी जेरबंद झाली आहे..Leopard Terror: रात्रभर पिंजऱ्याभोवती घिरट्या घालून मादी बिबट्याची हुलकावणी.जुन्नर वनउपसंरक्षक प्रशांत खाडे, सहायक वनसंरक्षक अमृत शिंदे, मंचर वनपरिक्षेत्र अधिकारी विकास भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक अश्विनी डफळ व इतरांच्या रेस्क्यू टीमने सातत्याने प्रयत्न केल्याने बिबट्या जेरबंद होण्यास मदत झाली. पिंजऱ्यात अडकलेली मादी सध्या अवसरी घाटातील वनकेंद्रात पाठवण्यात आली असून नंतर तिला माणिकडोह येथे पाठवण्यात येईल..या परिसरात बऱ्याच दिवसांपासून बिबटमादी आणि तिच्या बछड्यांचा वावर होता. अनेक ग्रामस्थांना आपल्या घरांजवळच्या परिसरात त्यांच्या पायांचे ठसे काही दिवसांपासून आढळत होते..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.