Niphad News: देवगाव परिसरात काही दिवसांपासून दहशत माजविणारा बिबट्या अखेर बुधवारी (ता. १२) पहाटेच्या सुमारास वन विभागाने शरद जोशी यांच्या शेतातील पिंजऱ्यात जेरबंद केला. अंदाजे पाच वर्षांचा हा नर बिबट्या असल्याची माहिती रेस्क्यू टीमने दिली. .मात्र, या बिबट्याला जिवंत पकडून घेऊन जाण्याऐवजी जागेवरच ठार करावे, या मागणीसाठी ग्रामस्थ व विद्यार्थ्यांनी चार तास ‘रास्ता रोको’ करीत आंदोलन छेडले होते. अखेर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी आंदोलकांचा आक्रमक पवित्रा पाहता बिबट्या ठार करण्यासंदर्भात वरिष्ठांकडे पत्रव्यवहार केल्यावर आंदोलक शांत झाले..Leopard Rescue : साडे सात तासांची शोधमोहीम; वडनेर दुमालात बिबट्या जेरबंद .देवगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे चेअरमन सतीश बोचरे, धनंजय जोशी, उपसरपंच लहानू मेमाणे, मनोहर बोचरे, राजेंद्र मेमाणे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थ व विद्यार्थ्यांनी रस्ता रोको करून वन विभागाचे सहायक वनसंरक्षक शिवाजी सहाने, वनपरीक्षेत्र अधिकारी राहुल घुगे, सहायक पोलिस निरीक्षक भास्कर शिदि, पोलिस उपनिरीक्षक मोहन पाटील, हवालदार औदुंबर मुरडगर, संदीप शिंदे यांना घेराव घातला. आंदोलकांनी वन विभागाचा पिंजरा अडवून ठेवत, ‘जोपर्यंत बिबट्या ठार मारला जात नाही, तोपर्यंत विद्यार्थी शाळेत जाणार नाहीत,’ अशी ठाम भूमिका घेतली होती..या वेळी आंदोलक आणि प्रशासनात तणाव निर्माण झाला. आंदोलकांचा आक्रमक पवित्रा पाहता वन विभागाने बिबट्या ठार मारण्यासंदर्भात वरिष्ठांकडे पत्रव्यवहार केला. तसेच देवगाव, रुई, देवगाव फाटा, वाकद परिसरात बिबट्यामुळे जीवित वा वित्तहानी झाल्यास वन विभाग जबाबदार राहील, असे लेखी निवेदन घेण्यात आले..Human Wildlife Conflict: संशोधनाची विजेरी पेटवा....दरम्यान, वन विभागाची रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल होत असून, ड्रोनच्या साहाय्याने परिसर पिंजून काढण्यात येत आहे. परिसरात चार ठिकाणी नवीन पिंजरे बसविण्यात आले आहेत. आंदोलनात जयेश लोहारकर, सचिन बोचरे, संतोष लोहारकर, ज्ञानेश्वर आरोटे, रेवणसिद्ध लोहारकर, बापू बोचरे, दीपक आढागळे आदी ग्रामस्थ, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पोलिस पाटील सुनील बोचरे यांच्या मार्गदर्शनाखाली लासलगाव पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी यांनी बंदोबस्त ठेवला..वन विभाग आणि ग्रामस्थांमध्ये वाद या घटनेनंतर जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या अमृता पवार, उपसरपंच लहानू मेमाणे, तसेच सतीश बोचरे, मनोहर बोचरे, धनंजय जोशी, जयवंत लोहारकर आदींसह ग्रामस्थ आणि शालेय विद्यार्थी रस्त्यावर उतरले. ‘जोपर्यंत बिबट्याला ठार केले जात नाही, तोपर्यंत शाळा बंद’ अशा घोषणा देत नागरिकांनी देवगाव फाटा येथे ‘रास्ता रोको’ केले. या वेळी वन विभाग आणि ग्रामस्थांमध्ये शाब्दिक वाद झाला..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.