Pune News: दौंडज (ता. पुरंदर) हद्दीतील नलावडेवाडी येथील परिसरात गेल्या काही दिवसांपूर्वी पुणे-पंढरपूर पालखी महामार्गावर गुजरमळा येथे बिबट्याचे दर्शन झाले होते. परिसरात पुन्हा नलावडेवाडीजवळील जुनावना येथे एका गाईचा फडशा पाडल्याची घटना शनिवार (ता. २९) सकाळच्या सुमारास उघडकीस आली. या भागात भितीचे वातावरण निर्माण झाले असून वनविभागाने या बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी पोलिस पाटील दिनेश जाधव यांनी केली आहे..दौंडज हद्दीतील नलावडेवाडी येथील रहिवासी सुभाष भिवा माने यांची जुना खंडोबा गडाच्या पायथ्यालगत जुनावना परिसरामध्ये जनावरांचा गोठा असून ते दुग्ध व्यवसायदेखील करतात. शनिवारी सकाळी नेहमीप्रमाणे ते आपल्या गोठ्याकडे गेले असता गोठ्यातील गाईवर हल्ला करून तिला बिबट्याने भक्ष्य केल्याची.Leopard Attack: जनावरांचा बिबट्याकडून फडशा.बाब त्यांच्या निदर्शनास आली. यानंतर माने यांनी याबाबत वनविभागाला माहिती दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सासवड वनपरिक्षेत्र अधिकारी सागर ढोले व वनपाल दीपाली शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक धनंजय देवकर यांनी तत्काळ दखल घेऊन घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते महादेव माने, माजी उपसरपंच विजय फाळके, पांडुरंग माने, दत्ता माने, धनाजी माने आदी उपस्थित होते..Leopard Attack: बिबटहल्ले राज्य आपत्ती.वाल्हे पंचक्रोशीतील पिंगोरी, मांडकी परिसरात बिबट्याकडून पाळीव जनावरांवर वारंवार हल्ले होत असतानाच शनिवारी आमच्या वस्तीवर बिबट्याने गाईवर हल्ला करत ठार मारले आहे. संबंधित शेतकऱ्याला वनविभागाकडून तत्काळ आर्थिक नुकसान भरपाई मिळावी. बिबट्याच्या वावरामुळे परिसरात शेतकऱ्यांसह शेतमजुरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून वनविभागाने तत्काळ बिबट्याला जेरबंद करावे.- महादेव माने, सामाजिक कार्यकर्ते.दौंडज हद्दीतील जुनावना परिसरामध्ये बिबट्याने गाईवर हल्ला करून ठार झाल्याने ग्रामस्थांसह शेतकऱ्यांमध्ये घबराट पसरली आहे. याची तत्काळ दखल घेत सासवड वनपरिक्षेत्र अधिकारी सागर ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामस्थांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे.- दीपाली शिंदे, वनपाल,.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.