Leopard Spotted in Chakan Industrial Area: कुरुळी/चाकण येथील औद्योगिक वसाहतीतील सॅनी हेवी इंडस्ट्रीज व मर्सिडीज बेंझ कंपनीच्या परिसरात आज पहाटे साडेचारच्या सुमारास बिबट्या आढळल्याने खळबळ उडाली आहे. वनविभागाने तातडीने दखल घेत परिसरात पाहणी केली असून, खबरदारीचा उपाय म्हणून बिबट्याला जेरबंद करण्यासाठी दोन पिंजरे लावले आहेत..औद्योगिक वसाहतीतील मर्सिडीज बेंज आणि लगतच्या कंपनीत बिबट्या वावरत असल्याचे कामगार व सुरक्षा रक्षकांनी पाहिले. याची माहिती मिळताच चाकण वनपरिक्षेत्राचे अधिकारी संतोष कंक यांनी पथकासह घटनास्थळी भेट दिली. कंपनी अधिकारी व कामगारांशी चर्चा केल्यानंतर वनविभागाने परिसराची कसून तपासणी केली..Leopard Captured: दोन पिलांसह मादी बिबट जेरबंद.प्रत्यक्ष पाहणीत बिबट्या आढळला नसला तरी, कंपन्यांच्या आवारातील दाट झाडीझुडपांमुळे बिबट्याचा वावर असण्याची शक्यता वनविभागाने मान्य केली आहे. यापूर्वीही बजाज ऑटो कंपनीच्या परिसरात बिबट्या आढळला होता..Leopard Attack: बिबट्याच्या हल्ल्यात दोन वासरांचा मृत्यू.औद्योगिक क्षेत्रात कामगारांची मोठी संख्या असल्याने कोणालाही इजा होऊ नये, यासाठी वनविभागाने गस्त वाढवावी, अशी मागणी उद्योजकांकडून होत आहे. सध्या वनविभागाचे कर्मचारी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत..बिबट्या दिसल्याची माहिती मिळताच आम्ही पाहणी केली आहे. औद्योगिक वसाहतीत झाडांचे प्रमाण जास्त असल्याने वन्यप्राण्यांचा वावर असू शकतो. खबरदारी म्हणून आम्ही पिंजरा लावला असून, कामगारांच्या सुरक्षेची पूर्ण दखल घेतली जात आहे. संतोष कंक, वनपरिक्षेत्र अधिकारी, चाकण.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.