Vanvibhag Pune News: सावजाचा पाठलाग करताना नागापूर (ता. आंबेगाव) येथील मिंडेवस्तीमधील विहिरीत पडलेल्या बिबट्याला वनविभागाने सुरक्षित बाहेर काढून जीवदान दिले. ही घटना सोमवारी (ता. २७) घडली..नागापूर रस्त्यावर मिंडे वस्ती येथे अंगणवाडीजवळ सुनील शंकर मिंडे यांची जुनी विहीर आहे. तिच्या भोवती झाडाझुडुपांनी वेढा घातला आहे. येथील शेतकरी अनिल शांताराम मिंडे हे जनावरांसाठी मका आणण्यासाठी विहिरीजवळून जात होते..Leopard Roar: गुणोरे परिसरात बिबट्याचा धुमाकूळ.यावेळी काहीतरी आवाज येत असल्याचे पाहून त्यांनी विहिरीत डोकावले. त्यावेळी त्यांना विहिरीत बिबट्या पडलेला दिसून आला. बिबट्याबाबतची माहिती वनविभागाला दिल्यानंतर वनविभागाचे कर्मचारी आणि रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाले..Leopard Spotted: चाकण ‘एमआयडीसी’त बिबट्याचे दर्शन.स्थानिकांच्या मदतीने वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी दोर लावून विहिरीत पिंजरा सोडला व बिबट्यास सुरक्षित बाहेर काढले आहे. दरम्यान, हा बिबट्या नर जातीचा असून चार वर्षांचा आहे. प्राथमिक तपासणी करून त्याला जुन्नर तालुक्यातील माणिकडोह बिबट निवारा केंद्रात हलवण्यात आले..नागापूर परिसरात, ढोले मळ्यात गेल्या दोन दिवसांपासून बिबट्यांचा वावर आहे. असे असूनदेखील पिंजरा लावला जात नाही, या बाबत ग्रामस्थांकडून नाराजी व्यक्त होत आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.