Jalna News : जालना जिल्ह्यात सध्या सर्वत्र ऊसतोडीचा हंगाम सुरू झाला आहे. जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील सुखापुरी मंडलात मंगळवारी (ता. ११) बिबट्याचा वावर असल्याचे वन विभागाच्या रेस्क्यू पथकाने जाऊन स्थळ पाहणी केल्यानंतर लक्षात आले आहे.माहितीनुसार, अंबड तालुक्यातील सुखापुरी मंडलात मंगळवारी पिठोरी सिरसगाव शिवारात शेतकऱ्यांना बिबट वन्य प्राणी दिसल्याच्या माहितीवरून वन विभागाच्या रेस्क्यू टीमने जायमोक्यावर जाऊन पाहणी केली. या पाहणी दरम्यान बिबटचा या परिसरात वावर असल्याचे दिसून आले. हा वन्य प्राणी या भागात साधारण १० किलोमीटरच्या परिघात वावरत असून या क्षेत्रात प्रामुख्याने उसाचे पीक आहे.. सध्या ऊसतोडीचा हंगाम चालू असल्याने बिबट प्राणी शेतकऱ्यांना दिसून येत आहे. सुखापुरी मंडलात सुखापुरी, वडीकाळ्या, एकनाथ नगर, वडीगोद्री, पिठोरी सिरसगाव, कारंजळा या गावांचा समावेश आहे. या गावातील ग्रामस्थ, शेतकरी व ऊसतोड करणाऱ्या मजुरांमध्ये वन्यजीव बचाव टीमकडून वन्य प्राणी बिबटबाबत जनजागृती करण्यात येत आहे. .Kolhapur Leopard Attack: कोल्हापूर शहरातील मुख्य वस्तीत बिबट्याचा थरार, तिघांवर हल्ला, दोन तासांत जेरबंद.ऊसतोडणी किंवा शेतीची कामे करताना शक्यतो समूहाने कामे करावीत. एकट्या व्यक्तीने ऊसतोड किंवा शेतीची कामे करू नयेत. बिबट आढळून आल्याने ऊसतोडणी सुरू असताना शेतकऱ्यांनी व मजुरांनी आपल्या लहान मुलांना सुरक्षित ठिकाणी ठेवावे. गावाजवळ, शेतात किंवा गावठाण हद्दीत बिबट दिसल्यास बघण्यासाठी गर्दी करू नये. त्यांना दगड मारून पळविण्याचा किंवा मोबाइलवर फोटो काढण्याचा प्रयत्न करू नये..जिल्ह्यात बिबट किंवा त्याची पिले आढळल्यास तत्काळ संबंधित वन विभागाचे वनपरीक्षेत्र अधिकारी विजय दौंड (मो. ८२६२०७८८८६), वनपरिमंडळ अधिकारी बी. एम. पाटील (मो.९७३०४१४२८७) आणि वनरक्षक कैलास कदम (मो.९७३०१३१४९८) यांच्या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधून माहिती द्यावी..Leopard Attack : शेतात आजोबांना पाणी देणाऱ्या नातीवर बिबट्याचा हल्ला.जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी व ऊसतोड मजुरांनी शेतातील कामे करतांनी सावधानता बाळगावी असेही आवाहन जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी केले आहे. वन विभागाकडून जनजागृती उंदीर, पक्षी, सरपटणारे प्राणी, डुकरे आणि कुत्रे हे बिबट्याचे खाद्य आहे. प्रत्येक बिबट्याला पोकळ ठिपक्यांची विशिष्ट रचना असते. .त्यामुळे गावाजवळीत शेतात बिबट आल्यास त्याला बघण्यासाठी गर्दी करू नये, दगड मारून त्याला पळविण्याचा प्रयत्न करू नये, पहाटे व सायंकाळी अंधारात गावाबाहेर व शेतात जाण्याचे काही काळ टाळावे, बिबट दिसताच जवळच्या वनरक्षक व चौकीदाराला कॉल करून माहिती द्यावी. पाळीव प्राण्यांना बंदिस्त आणि सुरक्षित ठिकाणी ठेवावे. अचानक बिबट जवळ दिसल्यास शांत राहण्याचा प्रयत्न करा. बिबट्याला त्यांच्या मार्गाने जाऊ द्या, आणि तत्काळ वन विभागाला १९२६ या क्रमांकावर संपर्क साधावा..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.