Pune News: चाकण परिसरातील ऊसशेतीसह वनक्षेत्र आणि औद्योगिक वसाहतींमध्ये बिबट्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या परिसरात सुमारे ६० बिबटे असल्याचा वनविभागाचा अंदाज असून त्यांना पकडण्यासाठी २५ पिंजऱ्यांची तरतूद करण्यात आली आहे..चाकण परिसरात चाकणसह आळंदी, पाईट, आंबोली, वांद्रा, चिंचोशी, कोयाळी, वडगाव घेनंद, दौंडकरवाडी, मेदनकरवाडी, कडाचीवाडी, केळगाव, चिंबळी, माजगाव, चऱ्होली, धानोरे वनपरिक्षेत्राच्या हद्दीत सुमारे साडेआठ हजार हेक्टर वनक्षेत्र आहे. या वनक्षेत्रात मोठ्या प्रमाणात विविध वन्यजीवांचा वावर आहे. यामध्ये कोल्हे, लांडगे, तरस, मोर, रानडुकरे, ससे व इतर प्राण्यांचा मोठा वावर आहे..Leopard Terror: मोखाड्यात बिबट्यासाठी पिंजरा.तसेच, वनपरिक्षेत्राजवळ काही गावांत मोठ्या प्रमाणात उसाची शेती आहे. त्यामुळे तिथेही बिबट्यांना आश्रयस्थान मिळाले आहे. हे बिबटे ऊस काढणी झाल्यानंतर भक्ष्याच्या शोधात नागरी परिसरात येतात. त्यामुळे अगदी चाकण शहराच्या मध्यवर्ती ठिकाणीही बिबट्याचे दर्शन अनेकदा झाले आहे. तसेच, मानव-वन्यजीव संघर्षदेखील निर्माण झाला आहे..Leopard Alert: रांजणगावच्या औद्योगिक क्षेत्रात धडकला बिबट्या.बिबट्यांचा वावर वाढलेल्या ठिकाणी तात्काळ पिंजरे लावले जातील, असे चाकण वनपरिक्षेत्राचे अधिकारी संतोष कंक यांनी सांगितले. मागच्या आठवड्यात पाईट परिसरात बिबट्याने दुचाकीवर चाललेल्या एका तरुणावर हल्ला केला होता. त्यात तो तरुण किरकोळ जखमी झाला होता..गेल्या वर्षभरात चाकण वनपरिक्षेत्राच्या हद्दीत कोयाळी, दौंडकरवाडी, चाकण या ठिकाणी तीन बिबटे जेरबंद करण्यात आले आहेत. या परिसरात आणखी बिबट्यांचा वावर वाढल्याची आणि त्या अनुषंगाने पिंजऱ्यांचे नियोजन करण्यात आल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष कंक यांनी सांगितले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.