Raigad News: अलिबाग-मुरूड परिसर हा अथांग समुद्र, रुपेरी वाळू, स्वच्छ किनारे आणि आंबा, नारळाच्या हिरव्या बागांनी सजलेला पर्यटनपट्टा म्हणून प्रसिद्ध आहे. मुंबई आणि पुण्याच्या जवळ असल्याने वर्षअखेरीस सुट्टीचा आनंद घेण्यासाठी हजारो पर्यटक या परिसराची निवड करतात..यंदाही नाताळ आणि नववर्ष स्वागतासाठी अलिबाग, मुरूड परिसरांतील रिसॉर्ट्स, होमस्टे, फार्महाउस यांची सुमारे ८० टक्के बुकिंग आधीच पूर्ण झाली होती. वर्षातील शेवटचे क्षण शांततेत आणि आनंदात घालविण्याचा पर्यटकांचा बेत पक्का केलेला असताना बिबट्याने गोंधळ घातला. या बिबट्याला वन विभागाने अद्याप जेरबंद केलेले नसल्याने त्याच्या भीतीने झालेली बुकिंग रद्द होऊ लागली आहे..Leopard Terror: रात्रभर पिंजऱ्याभोवती घिरट्या घालून मादी बिबट्याची हुलकावणी.पर्यटकांची सर्वाधिक रहदारी असलेल्या नागाव परिसरात अचानक प्रकट झालेल्या बिबट्याच्या हल्ल्यांनी संपूर्ण वातावरणच ढवळून निघाले. मंगळवार (ता. ९)पासून सलग दोन दिवस या बिबट्याने गोंधळ घातला. त्याचा वारंवार दिसणारा वावर आणि हल्ल्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. या काळात बिबट्याने सहा जणांना जखमी केले, ज्यामुळे परिस्थिती गंभीर बनली. त्यानंतर तो अचानक गायब झाला आणि तो कुठे लपून बसला आहे, .Leopard Terror : खानदेशात पर्वतीय भागात बिबट्यांची दहशत.याचा कोणताही ठावठिकाणा अद्याप वन विभागाकडे नाही, ही परिस्थिती अधिक भयावह मानली जात आहे. नागावसह आसपासच्या भागात बिबट्याची दहशत एवढी पसरली, की येथील शाळा, दुकाने, कॉटेजेस, होम-स्टे आणि पर्यटन व्यवसाय दोन दिवस पूर्णपणे ठप्प राहिले. नागाव किनाऱ्यावर आलेले अनेक पर्यटक भीतीने परत फिरले. काहींनी बुकिंग्ज रद्द करून सुरक्षेचा मार्ग निवडला. याचा परिणाम संपूर्ण पर्यटन हंगामावर होत असून, नाताळ आणि नववर्षाचे आरक्षण रद्द होणे सुरू झाले आहे..अलिबाग, मुरूड परिसरात वर्षअखेरीचा हंगाम हा सर्वांत मोठा महसूल देणारा काळ असतो, मात्र बिबट्याच्या दहशतीमुळे हा हंगामच धोक्यात आला आहे. पर्यटन महसुलात मोठी घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.- सचिन राऊळ, पर्यटन व्यावसायिक, नागाव.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.