Mumbai News: राज्यात दिवसेंदिवस बिबट्यांचा मानवी वस्तीतील वावर वाढत असून मानवावर होत असलेले हल्ले चिंताजनक आहेत. ही एक प्रकारची राज्य आपत्तीच असल्याचे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी (ता. १८) बैठकीत व्यक्त केले. .याबाबत पुढील आठवड्यात निर्णय घेऊन आपत्ती घोषणेसाठी प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश वनविभागाला देण्यात आले. तसेच बिबट्यांना वन्यजीव संरक्षण अधिनियमाच्या शेड्यूल एकमधून वगळून शेड्यूल दोनमध्ये समाविष्ट करण्याबाबतही प्रस्ताव केंद्राला प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश दिले आहेत..राज्यात ठिकठिकाणी मानवी वस्तीत बिबट्यांचा वावर वाढला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात लहान बालकांवर हल्ले करून त्यांना ओढून देण्याचे प्रकार वाढले आहेत. कोल्हापूर, नाशिक येथे भरवस्तीत बिबटे आल्याने धोका वाढला आहे. दोन दिवसांपूर्वी पुण्यात वनमंत्री गणेश नाईक यांनी बैठक घेऊन बिबट्यांना त्यांच्या क्षेत्रात खिळवून ठेवण्यासाठी शेळ्या पुरविणे, पिंजरे बसविणे आणि अन्य उपाययोजनांवर काम करत असल्याचे सांगितले होते..Leopard Attack: वडिलांच्या प्रसंगावधानाने बिबट्याच्या हल्ल्यातून मुलाची सुटका.मंगळवारी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीत बिबट्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी वावर असलेल्या ठिकाणी तातडीने पिंजरे बसवावेत. यासोबतच पुणे जिल्ह्यात बिबट्यांच्या उपचार आणि पुनर्वसनासाठी दोन रेस्क्यू सेंटर पुढील दोन ते तीन महिन्यांत सुरू करण्याचे आदेश दिले आहेत..बिबट्याकडून वारंवार हल्ले होत असून यात प्राणहानी होत आहे. हल्ले वाढत असल्याने सायंकाळी सहानंतर वावर असलेल्या भागात रस्ते, वस्त्या निर्मनुष्य होत आहेत. शेतात कामे करणे अशक्य झाले आहे. बिबट्यांचे हल्ले ही आपत्ती आहे. त्यामुळे ती घोषित करण्यासाठी तातडीने प्रस्ताव तयार करा, असे निर्देश श्री. फडणवीस यांनी दिले. .Leopard Attack: बिबट्याच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू.बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, वनमंत्री गणेश नाईक, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, आमदार शरद सोनवणे, माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, मुख्य सचिव राजेशकुमार, वन विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, राज्याचे प्रधान मुख्य वन संरक्षक (वनबल प्रमुख) एम. श्रीनिवास राव, प्रधान मुख्य वन संरक्षक (वन्य जीव) श्रीनिवास रेड्डी, पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी आदी उपस्थित होते. .‘पिंजरे पुरवा’पुणे, अहिल्यानगरसह राज्यात जेथे बिबट्यांचा वावर आहे, तेथे तातडीने पिंजरे बसविण्याचे आदेश वनविभागाला दिले. येत्या दोन ते तीन महिन्यांत पुणे जिल्ह्यात बिबट्यांसाठी तातडीने दोन बचाव केंद्रे सुरू करा, असेही निर्देश श्री. फडणवीस यांनी दिले..शेड्यूल बदलण्याच्या हालचालीबिबट्यांचा समावेश शेड्यूल एकमध्ये आहे. त्यामुळे नरभक्षक बिबट्यांना पकडणे, त्यांना मारणे यावर मर्यादा येतात. त्यामुळे बिबट्यांना शेड्यूल एकमधून काढण्यासंबंधी केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठवावा. बिबट्यांच्या नसबंदीची परवानगी केंद्र शासनाकडून मिळाली आहे. त्यामुळे नरभक्षक बिबट्यांना शोधून नसबंदी करण्यात यावी, असेही निर्देशही बैठकीत देण्यात आले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.