राज्यातील बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर वनमंत्री गणेश नाईक यांची प्रतिक्रियाबिबट्यांचे हल्ले यापुढे होणार नाहीतबिबट्यांच्या नसबंदीसाठी परवानगी मिळाली आहे, पण कमी प्रमाणात ही उपाययोजना मोठ्या प्रमाणात राबविण्यासाठी केंद्राच्या वन विभागाकडून परवानगी घेऊ.Maharashtra Forest Minister Ganesh Naik statement on Leopard Attack: राज्यातील बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर वनमंत्री गणेश नाईक यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बिबट्यांचे हल्ले यापुढे होणार नाहीत. बिबटे जंगलातच राहतील, यासाठी आमचा प्रयत्न राहील. बिबट्यांच्या नसबंदीसाठी परवानगी मिळाली आहे. पण हे कमी प्रमाणात असून सहा महिन्यांत आम्हाला कळेल हे यशस्वी होत आहे की नाही. ही उपाययोजना मोठ्या प्रमाणात राबविण्यासाठी केंद्राच्या वन विभागाकडून परवानगी घेऊ. यातून मार्ग निघेल, अशी आशा मंत्री यांनी व्यक्त केली आहे. ते नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलत होते. .नागपूर जिल्ह्यातील पारडी येथील शिवनगर भागात बिबट्याच्या हल्ल्यात सातजण जखमी झाले. त्यातील एकाची प्रकृती गंभीर आहे. त्याच्यावर स्थानिक रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. दरम्यान, गणेश नाईक यांनी बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या सात जणांची भेट घेत त्यांची विचारपूस केली. या पार्श्वभूमीवर बोलताना ते म्हणाले की, मी सात रुग्णांची भेट घेतली आणि सर्वजण धोक्याबाहेर आहेत आणि मला आशा आहे की भविष्यात अशा घटना पुन्हा घडणार नाहीत..Leopard Control: बिबट्यांसाठी जंगलात शेळ्या सोडू : गणेश नाईक.जरी बिबट्या मानवी वस्तीत आला तरी लोकांना सतर्क करण्याचे काम वन विभागाची यंत्रणा करेल. संपूर्ण महाराष्ट्रात बिबट्यांची समस्या दिसून येत आहे. त्याचा बंदोबस्त करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. हिंस्र प्राण्यांना जंगलात शिकार मिळत नाही. त्यामुळे शेतात येतात. तर काही प्राण्यांना खाण्याठी फळझाडे लावण्याचा प्रयत्न आहे. यासाठी नियोजन सुरु आहे. एआय आधारित यंत्रणा बसविली असून बिबट्या अथवा वाघ जरी दिसला तरी सायरन वाजेल. जिथे बिबट्यांचा अधिक वावर आहे; तिथे ही यंत्रणा बसवली आहे. जिथे गरज आहे तिथे ही यंत्रणा बसविली जाईल, असे वनमंत्री नाईक यांनी सांगितले. .Leopard Attack: बिबट्याच्या दहशतीनं शेती उजाड, रेस्क्यू सेंटर बनवा, जुन्नरचे आमदार शरद सोनवणे बिबट्याच्या वेशात विधानभवनात.बिबट्याचा हल्ला हा राज्य आपत्ती म्हणून पाहिले जात आहे. बिबट्या जंगलातच राहील असा आमचा प्रयत्न असल्याचे त्यांनी नमूद केले. दरम्यान, जुन्नरचे आमदार शरद सोनवणे आज विधानभवनात बिबट्याच्या वेशात दाखल झाले. त्यांनी बिबट्याच्या समस्या किती गंभीर आहे? हे सांगण्याचा प्रयत्न केला. बिबट्याचे दोन रेस्क्यू सेंटर बनविण्याची मागणी केली आहे. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.