Pune News : शेतात काम करत असलेल्या आजोबांना पाणी घेऊन जाणाऱ्या शिवन्या शैलेश बोंबे (वय साडेपाच) या चिमुरडीचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. रविवारी (ता. १२) पिंपरखेड (ता. शिरूर) येथे सकाळी १० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. .तर गेल्या तीन वर्षांत पिंपरखेड व जांबुत या गावांच्या पाच किलोमीटरच्या परिघात बिबट्याने केलेल्या हल्ल्यात तब्बल सहा जणांचा मृत्यू, तर ५० हून अधिक शेतकरी जखमी झाले आहेत. बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे..Leopard Terror : नेवासे तालुक्यातील चांदा शिवारात बिबट्याची दहशत, शेतकरी त्रस्त.पिंपरखेड गावाच्या हद्दीतील बोंबेमळा-कासार वस्ती येथे शेतमशागतीचे काम सुरू होते आजोबा अरुण देवराम बोंबे यांना पाणी घेऊन शिवन्या जात होती. त्या वेळी अडीच फूट उंचीच्या उसामध्ये दबा धरून बसलेल्या बिबट्याने शिवन्याची मान धरून तिला उसाच्या शेतात ओढून नेण्याचा प्रयत्न केला. .Leopard Conflict: बिबट्या समस्या निवारणासाठी साखर कारखान्यांनी पुढाकार घ्यावा.त्या वेळी धाडस दाखवून मदतीसाठी आजोबा धावून आले. त्यांना पाहून बिबट्याने शिवान्याला सोडून उसाच्या शेतात पळ काढला. तिच्या मानेवर गंभीर स्वरूपाची दुखापत झाल्याने तिला तिचे वडील शैलेश, आई दिव्या व चुलते प्रफुल्ल यांनी मंचर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र अतिरक्तस्रावामुळे तिचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला..सदर घटनेची माहिती मिळताच माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, ‘म्हाडा’चे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील यांनी रुग्णालयात कुटुंबीयांची भेट घेऊन बोंबे कुटुंबीयांचे सांत्वन केले. अशा घटना यापुढे घडू नयेत म्हणून ताबडतोब वन खात्याने तातडीच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घ्याव्यात. अशा सूचना वळसे पाटील व आढळराव पाटील यांनी मोबाइलद्वारे जुन्नर वनविभागाचे उपवनसंरक्षक प्रशांत खाडे यांना दिल्या आहेत..दीड वर्षात ६ जणांचा मृत्यूपिंपरखेड व जांबुत या पाच किलोमीटर अंतरामध्ये २५ हून अधिक बिबट्यांचा वावर असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. गेल्या तीन वर्षांत पिंपरखेड येथे पूजा जाधव, शिवन्या व जांबुत येथे समीक्षा जोरी, सचिन जोरी, पूजा नरवडे, मुक्ताबाई खाडे अशा एकूण ६ जणांचा बिबट्याच्या हल्ल्यात प्राण गमवावे लागले आहेत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.