Nashik News: खडक ओझर (ता. चांदवड) शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात दोन शेतकरी जखमी झाले. मंगळवारी (ता. १०) दुपारी बाराच्या सुमारास हा प्रकार घडला. .चांदवड तालुक्यातील केद्राई देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या खडकओझर येथील नंदू मोतीराम पगार, बबन मोतीराम पगार हे दोन्ही भाऊ त्यांच्या शेतात साधारण दुपारी बाराच्या सुमारास गव्हाला पाणी देत होते अचानक दोन बिबट्यांनी त्यांच्यावर हल्ला चढवला. या हल्ल्यात दोघेही जखमी झाले. दोन्ही बिबट्याच्या हल्ल्यात दोघा शेतकरी बंधूच्या पोट, हात आणि पाठीवर बिबट्याचा पंजा आणि दातांनी बऱ्यापैकी जखमा केल्या आहेत. .Leopard Attack: बिबट्याच्या हल्ल्यात महिला शेतकरी जखमी.बिबट्याच्या हल्यात जखमी झाले असताना झटापटीत शेतात पडलेला मोबाईल आणायला गेल्यानंतर दबा धरुन बसलेल्या दुसऱ्या बिबट्याने हल्ला केला. एकाचवेळी दोन बिबट्यांच्या या हल्ल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. परिसरात भीतीचे वातावरण असून बिबट्यापासून सावध राहण्याचे जनावरे सुरक्षित स्थळी बांधण्याचे आवाहनही वन विभागाने केले आहे..Leopard Attack: बिबट्याने केलेल्या हल्ल्यात दोन वासरे ठार .मोठीदर शिवारात दोन पाळीव श्वानांवर हल्लाकळवण, ता. १० ः तालुक्यातील रवळजी परिसरातील मोठीदर शिवारात रविवारी (ता. ८) मध्यरात्री बिबट्याने दोन पाळीव श्वानांवर हल्ला करून त्यांना ठार केले. रवळजी येथील मोठीदर शिवारातील शेतकरी प्रकाश दोधा भालेराव व विठ्ठल चौरे यांच्यासह शिवारात मोठी वस्ती आहे. .रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्याने वस्तीवरील भालेराव यांच्या घरासमोरील पाळीव कुत्र्याला ठार केले. याच दरम्यान बिबट्याने वस्तीवरील विठ्ठल चौरे यांच्याही श्वानाला ठार केले. सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. मागील आठवड्यात धाकलदरी शिवारात पुंजाराम जाधव यांची एक शेळी फस्त केल्याची घटना घडल्याने वन विभागाने पंचनामा केला होता..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.