Raigad News: रब्बी हंगामात शेतकऱ्यांना भाजीपाल्यासारखी नगदी पिके घेता यावीत, उन्हाळ्यात पाणीटंचाई कमी व्हावी तसेच पाळीव जनावरांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी, या उद्देशाने जलसंधारण विभागामार्फत महाड तालुक्यातील शिवथर गावाजवळ काळ नदीवर सिमेंट काँक्रीटचा बंधारा बांधण्यात आला होता. मात्र अवघ्या एका वर्षातच या बंधाऱ्याला मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. बंधाऱ्यात पाणी साठत नसून संपूर्ण प्रकल्पच अपयशी ठरत असल्याचे चित्र समोर आले आहे. .राज्य शासनाच्या ‘पाणी आडवा-पाणी जिरवा’ या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत हा बंधारा उभारण्यात आला होता. मात्र लाखो रुपयांचा खर्च करूनही अपेक्षित लाभ शेतकऱ्यांना मिळत नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. बंधाऱ्यात पाणी टिकत नसल्यामुळे उन्हाळी शेती, भाजीपाला उत्पादन आणि पाणी साठवणुकीचा उद्देश पूर्णपणे फसल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे..Chaskaman Dam: चासकमान धरणातून रब्बीसाठी आवर्तन सुरू.शिवथर येथील बंधाऱ्याचे काम अपूर्ण असून त्यातील साठलेले पाणी कमी झाल्यानंतर अपूर्ण राहिलेले काम पूर्ण करण्यात येईल, असे जलसंधारण विभागाचे कनिष्ठ अभियंता किशोर भातसे यांनी सांगितले..Water Leakage: पाईट येथील बंधाऱ्याच्या दरवाजांना अज्ञाताकडून छिद्रे .ठेकेदाराची मनमानीयाच ठिकाणी पावसाळ्यात १८ व १९ ऑगस्ट २०२५ रोजी झालेल्या अतिवृष्टीदरम्यान बंधाऱ्याचे काम अर्धवट अवस्थेत असल्याने नदीचा प्रवाह थेट शेतात घुसला. त्यामुळे भाऊ परशुराम साळुंखे या शेतकऱ्याची शेती पूर्णपणे नापीक झाली..या नुकसानाबाबत त्यांनी माणगाव येथील जलसंधारण उपविभागीय कार्यालयात वारंवार तक्रारी करूनही अद्याप कोणतीही भरपाई मिळालेली नाही. तसेच बंधाऱ्याचे अपूर्ण कामही आजपर्यंत पूर्ण करण्यात आलेले नाही. ठेकेदाराच्या कामावर योग्य देखरेख न झाल्यामुळेच बंधाऱ्याला गळती लागल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.