रवींद्र पालकर, डॉ. उत्तम कदम, डॉ. सखाराम आघावMango Pest Infestation: आंबा हे महत्त्वाचे फळपीक असून यावर तुडतुडे, फळमाशी, खोडकिडा, पिठ्या ढेकूण, थ्रीप्स, मिजमाशी, कोईतील भुंगा इ. महत्त्वाच्या किडींचा प्रादुर्भाव आढळून येतो. अलीकडच्या काळात हवामान बदलाच्या परिणामस्वरूप अनेक किडींच्या वर्तनात तसेच त्यांच्या यजमान-पीक निवडीमध्ये उल्लेखनीय बदल झालेला दिसून येत आहे. .काजू पिकावरील प्रमुख कीड म्हणून ओळखली जाणारी ‘लीफ मायनर’ ही कीड आंब्यावरही आढळून येत आहे. या किडीचा प्रादुर्भाव सामान्यतः पावसाळ्यापासून सुरू होतो. रोप अवस्थेतील पीक, कोवळी पाने व फांद्यांवर किडीचे नुकसान दिसते..सध्याच्या परिस्थितीत या किडीचा आढळ काही प्रमाणात स्पष्टपणे दिसून येत आहे. या किडीचे नमुने अहिल्यानगर, सोलापूर तसेच पुणे जिल्ह्यातील अनेक ठिकाणी मिळाले आहेत. पिकाच्या वाणानुसारही कमी-अधिक प्रादुर्भाव दिसून येत आहे. या किडीमुळे होणारे नुकसान मुख्यतः पानांच्या ऊतकांमध्ये बोगदे तयार होण्याच्या स्वरूपात आढळते. .नवीन फांद्या तसेच पानांवर अनियमित खोडरेषा पडल्यामुळे हे नुकसान अनेकदा रोगांच्या लक्षणांसारखे दिसते. या पार्श्वभूमीवर आंबा पिकावरील दुय्यम मानल्या जाणाऱ्या या किडीची अचूक ओळख माहिती असणे अत्यंत गरजेचे आहे. या लेखात आंब्यावरील ‘लीफ मायनर’ किडीची छायाचित्रांद्वारे ओळख, जीवनचक्र तसेच नुकसानीचे तपशीलवार स्वरूप याबद्दल माहिती घेऊ..Mango Pest : आंबा मोहरावर भुरी, तुडतुड्याचा प्रादुर्भाव.शास्त्रीय नाव : अॅक्रोसेरकॉप्स सिंग्राम्मा (Acrocercops syngramma)यजमान पिके : काजू, आंबा, जांभूळ..किडीची ओळख व जीवनक्रमअंडी अंडी अतिशय लहान, पारदर्शक व चिकट स्वरूपाची असतात. ही अंडी कोवळ्या पानांच्या वरच्या बाजूला घातली जातात. एक मादी कीड तिच्या जीवनकाळात जवळपास ३८ ते ३६ अंडी देऊ शकते. साधारण ५ ते ७ दिवसांनी त्यातून अळी बाहेर येते..अळीनुकतीच अंड्यातून बाहेर पडलेली अळी फिक्कट पांढऱ्या रंगाची असून डोक्याचा रंग पिवळसर-तपकिरी असतो. अळी मोठी होताना तिचा रंग गुलाबी-तांबूस होतो. अळी नळीच्या आकाराची असून शेवटी थोडी बारीक होत जाते.अळ्या बहुतेक वेळा पानांवर तयार होणाऱ्या फोडासारख्या भागाखाली (blister) सक्रिय राहतात.अळ्या पानातील खाण्याच्या (mine) भागातून स्वतःचा मार्ग तयार करून बाहेर येतात आणि कोषावस्थेसाठी जमिनीवर पडतात.पूर्ण वाढ झालेल्या अळीची लांबी साधारण ५ ते ९ मि.मी. असते. अळी अवस्थेचा कालावधी १० ते १५ दिवसांचा असतो..Mango Pest Disease : आंब्यावर तुडतुडा, बुरशी.कोषावस्थाकोषावस्था प्रामुख्याने जमिनीत पूर्ण होते. काहीवेळा पानांच्या घडीत तयार होणाऱ्या पातळ आवरणयुक्त कोषातही होते. अळी कोषावस्थेत जाताना स्वतःभोवती एक पातळ पडद्यासारखे संरक्षणात्मक आवरण तयार करते. कोषावस्थेचा कालावधी साधारण ७ ते ९ दिवसांचा असतो.प्रौढप्रौढ किडीचा रंग चांदीसारखा करडा असून पुढील पंखांवर रुपेरी पट्टे आढळतात. डोळ्यांचा रंग लालसर असतो. प्रौढ नर किडीची लांबी ४.५ ते ६.८ मि.मी., तर मादीची लांबी ७.० ते ८.९ मि.मी. असते. संपूर्ण जीवनचक्र साधारण २० ते २५ दिवसांत पूर्ण होते..व्यवस्थापनप्रादुर्भावग्रस्त पाने अळ्यांसह तोडून नष्ट कराव्यात.किडीची कोष अवस्था जमिनीत असल्यामुळे जमिनीवरील पालापाचोळा गोळा करून स्वच्छता राखावी.जमिनीची मशागत करावी, जेणेकरून कोष बाहेर येऊन उन्हामुळे नष्ट होतील.या किडीचे महत्त्वाचे नैसर्गिक शत्रू कीटक उदा. चिलोनस प्रजाती, सिम्पायसिस प्रजाती, क्रायसोचारिस नेफेरियुस, ग्रीन लेसविंग यांचे संवर्धन करावे..नुकसानीचे स्वरूपअंड्यातून बाहेर पडताच लहान अळ्या काजूच्या पानांच्या वरच्या थरात पोखरण्यास (माइनिंग) सुरुवात करतात. त्यामुळे पानांच्या पृष्ठभागावर वळणदार खुणा दिसू लागतात.अळ्या त्वचेच्या थराखालीच सतत भक्षण करतात. अळीने खाल्लेल्या भागात सूज येते आणि मोठे ब्लिस्टरसारखे फोड तयारहोतात. हे फोड कालांतराने वाळून जातात, ज्यामुळे पाने तपकिरी होऊन वेडीवाकडी होतात. त्यावर करड्या-पांढऱ्या रंगाचे फोड दिसतात..पानांची वाढ होत असताना खाल्लेल्या ऊतकाचा भाग वाळल्यामुळे छिद्रे निर्माण होतात.किडीच्या नुकसानीमुळे कोवळी पाने कायमची खराब होतात. ती सुकतात, आकसतात आणि अकाली गळून पडतात.अळ्यांची खाण करण्याची प्रक्रिया कोवळ्या पानांपुरती मर्यादित नसून कोवळ्या फांद्यांवरही दिसून येते.लहान रोपांवर किडीचा प्रादुर्भाव तुलनेने जास्त आढळतो.जास्त प्रादुर्भावामध्ये एका पानावर साधारण १ ते ५ अळ्या दिसू शकतात.- रवींद्र पालकर ८८८८४०६५२२ (पीएच. डी. स्कॉलर, कीटकशास्त्र विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.