Latur News: लातूर जिल्हा परिषदेच्या ५९ गटांसाठी निवडणूक झाली. यात २३ जागा जिंकत काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष राहिला. भाजपला १८ जागांवर समाधान मानावे लागले आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेसने मुसंडी मारत १२ जागा जिंकल्या. शिवसेना, शिवसेना (यूबीटी), मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष या पक्षांना मात्र प्रत्येकी एका जागेवर समाधान मानावे लागले. दोन अपक्ष निवडून आले आहेत. एकाही पक्षाला स्पष्ट बहुमत नाही. .महापालिकेच्या निवडणुकीत भाजपच्या नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला काँग्रेसची ‘बी टीम’ असे संबोधून महायुती तोडली होती. याचाही फटका निवडणुकीत बसला होता. आता त्याच राष्ट्रवादी काँग्रेससोबत भाजपला जावे लागत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आली, तरच भाजपचे सत्तेत येण्याचे स्वप्न साकार होणार आहेत. त्यामुळे सत्तेत येण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसची बार्गेनिंग पॉवर वाढणार आहे. महत्त्वाच्या पदांवर त्यांचा आता दावा असणार आहे. कोणती पदे मिळतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे..Zilla Parishad Election 2026: महायुती वरचढ, राष्ट्रवादीला बळ.काँग्रेसच्या पाठिंब्यावर ‘राष्ट्रवादी’चा अध्यक्ष?जिल्हा परिषदेच्या सत्तेच्या चाव्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या हातात आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा परिषद अध्यक्षपदावर आडून बसले, तर भाजपला सत्तेत यायचे असेल तर ते पद द्यावे लागणार आहे. स्वतःला उपाध्यक्षपदावर समाधान मानावे लागणार आहे. दुसरीकडे काँग्रेसच्या पाठिंब्यावरदेखील राष्ट्रवादी काँग्रेसचा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष होऊ शकतो..या दोनही पक्षाचे संख्याबळ बहुमताच्या पुढे जाते. राष्ट्रवादी काँग्रेसचे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील व माजी मंत्री दिलीपराव देशमुख, आमदार अमित देशमुख यांचे सख्य लातूरकरांना माहीत आहे. संख्याबळ नसताना महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडीत भाजपने तातडीने वंचित बहुजन आघाडीला पाठिंबा जाहीर करीत आशा दाखविली होती. राजकारणात कधी काहीही होऊ शकते. त्यामुळे अशा खेळी होतील का? याकडे लक्ष लागले आहे..Zilla Parishad Elections: मनधरणीसाठी सोमवार महत्त्वाच्या.लक्षवेधी लढतीकामखेडा गटात काँग्रेसच्या आशा भिसे यांनी भाजपच्या सरिता भिसे यांचा तर सरवडी गणात भाजपच्या दीपा इंगळे यांनी काँग्रेसच्या राऊ पाटील यांचा अवघ्या दोन मतांनी पराभव केला.पानगाव गटातून डॉ. सुनील नागरगोजे तसेच गणातील श्रीदेवी गालफाडे, मोनिका सूर्यवंशी हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार विजयी झाले असून, जिल्ह्यात मनसेला खाते उघडण्यात यश आले आहे..रोहिणा गटातून माजी खासदार सुधाकर शिंगारे यांच्या कन्या सुप्रिया शिंगारे, जानवळ गटातून जिल्हा बँकेचे संचालक एन.आर. पाटील, वडवळ गटातून माजी सभापती ॲड. माधवराव कोळगावे, नळेगाव गटातून राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शिवाजी काळे यांचा पराभव झाला.जळकोट तालुक्यात माळहिप्परगा व घोणसी जि.प. गटात सासूविरुद्ध सुना अशा दोन लढती झाल्या. माळहिप्परगा गटात सासूला सुनेने, तर गुत्ती गटात सुनेला सासूने हरविले.लातूर जिल्हा परिषदेत दोन अपक्ष उमेदवारांची होणार एंट्री. भाजपच्या घटल्या, तर काँग्रेसच्या जागा वाढल्या.....यांचा झाला पराभवमागील निवडणुकीच्या तुलनेत भाजपच्या जागा घटल्या.माजी खासदार सुधाकर शंृगारे यांच्या मुलीचा पराभवमाजी आमदार दिनकर माने यांच्या सुनेचा पराभवमाजी आमदार त्र्यंबक भिसे यांच्या भावजयीचा पराभवजिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष नाथसिह देशमुख यांच्या पत्नीचा पराभवभाजपमध्ये प्रवेश केलेल्या औराद शहाजानीच्या सरपंचांचा पराभवशिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाध्यक्ष संतोष सोमवंशी यांच्या पत्नी पराभूत.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.