Latur News : जिल्ह्यात मागील दोन महिन्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले तरी यंदा पीक कापणी प्रयोगातून निघालेल्या उत्पन्नावरच पिकविम्याच्या भरपाईची मदार आहे. या स्थितीत काही दिवसापासून कृषी विभागाने पीकविमा कंपनीच्या मदतीने सोयाबीनचे पीक कापणी प्रयोग सुरु केले आहेत. .या स्थितीत अनेक मंडळात पीक कापणी प्रयोगातून नुकसानीचे अचूक मोजमाप होत नसल्याच्या तक्रारी येत आहेत. त्याची दखल घेऊन पिकांच्या नुकसानीची अचूक गणना करण्यासाठी प्रत्येक महसूल मंडळ व गटात वाढीव सहा पीक कापणी प्रयोग घेण्यात येणार आहेत..जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर - घुगे यांनी अध्यक्षतेखाली मंगळवारी (ता. ७) झालेल्या जिल्हास्तरीय आढावा व सुकाणू समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. पंतप्रधान पीक विमा योजनेत यंदा पीक कापणी प्रयोगातून आलेल्या उत्पन्नाची मागील पाच वर्षातील सरासरी उत्पन्नाशी म्हणजे उंबरठा उत्पन्नाशी तुलना करून नुकसान निश्चित केले जाणार असून त्याआधारे भरपाई देण्यात येणार आहे. यंदा अतिवृष्टीमुळे सोयाबीन परिपक्व झाले नाही. सातत्याने पाण्याखाली आल्यामुळे त्यातील ओलावा कायम आहे. .Rain Crop Damage : शेकडो हेक्टरवरील पिकांचे नुकसान.हवेत आर्द्रता असली तरी सोयाबीनचे वजन वाढते. वाढलेल्या वजनातच प्रशासनाने पीकविमा योजनेत पीक कापणी प्रयोग हाती घेतले आहेत. अनेक ठिकाणी सोयाबीनमध्ये ओल असल्यामुळे त्याचे वजन वाढले तरी आठ दिवसानंतर सोयाबीन वाळवल्यानंतरच त्याचे वजन ग्राह्य धरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यंदा सोयाबीनच्या वजनाची समस्या राहणार असून अनेक भागात पीक कापणी प्रयोगातून जास्त वजन आल्याची चर्चा असून त्याचा भरपाईवर परिणाम होण्याची शक्यता आहे. पीक कापणी प्रयोगातून विमा कंपनीचे भले करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप सुरु आहे. .यामुळे लोकप्रतिनिधी व शेतकरी पीक कापणी प्रयोगाबाबत सतर्क झाले असून त्यांनी प्रयोगावर आक्षेप घेतले आहेत. यातूनच ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टी पिकांचे अतोनात नुकसान झाल्याच्या पार्श्वभूमीवर पीक विमा योजना व पीक कापणी प्रयोगाचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी जिल्हास्तरीय आढावा समिती व जिल्हास्तरीय सुकाणू समितीची बैठक घेण्यात आली. बैठकीत अतिवृष्टीमुळे पिकांच्या नुकसानीवर चर्चा झाली. या स्थितीत पीक कापणी प्रयोगातून जास्त उत्पन्न कसे निघत आहे, असा प्रश्न सर्वांना पडला आहे..Rain Crop Damage : अतिवृष्टीचा ३ लाख ५२ हजार हेक्टरला तडाखा .एका गटात १६ ते १८ प्रयोग होणारजिल्ह्यातील सर्वच महसूल मंडळात पाच वेळा अतिवृष्टी झाली आहे. सततच्या पावसाने पिकांचे दाणे कुजणे, बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होणे, मुळकुज होणे, दाण्यांना मोड येणे, दाणे काळे पडणे, धान्याची प्रत खराब होणे आदी प्रकारामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे पीक कापणी प्रयोगातून नुकसानीची अचूक मोजमाप करावे, अशी मागणी लोकप्रतिनिधी व शेतकरी करत आहेत. .त्याची दखल घेऊन समितीने प्रत्येक अधिसूचित गटात (मंडळात) सोयाबीन पीक कापणी प्रयोग वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. पूर्वी एका गटात बारा प्रयोग घेण्यात येत होते. आता पन्नास टक्के जास्त प्रयोग घेण्यात येणार असून एका गटात १६ ते १८ प्रयोग होणार आहेत. त्यानुसार वाढीव सहासह पीक कापणी प्रयोगाचे नियोजन कृषी विभागाने केल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवसांब लाडके यांनी दिली..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.