Latur News: अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणाली अधिक सुलभ व लोकाभिमुख करण्यासाठी पब्लिक लॉगिन ही ऑनलाइन सुविधा कार्यान्वित केली आहे. या सुविधेमुळे नागरिकांना शिधापत्रिकेसंदर्भातील विविध कामांसाठी शासकीय कार्यालयांच्या फेऱ्या मारण्याची गरज नसून, घरबसल्या अर्ज करता येणार आहेत..याबाबत जळकोट तहसीलादार राजेश लांडगे यांनी सांगितले, की ‘पब्लिक लॉगिन’द्वारे नागरिकांना नवीन शिधापत्रिकेसाठी अर्ज करणे, कुटुंबातील सदस्याचे नाव वाढवणे किंवा कमी करणे, पत्ता बदलणे तसेच नाव, वय, व्यवसाय किंवा आधार क्रमांकातील दुरुस्ती करणे या सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. .Digital Ration Card : आता काढा घरबसल्या ‘डिजिटल शिधापत्रिक्रा’.विभक्त किंवा नवीन कुटुंबासाठी नवीन शिधापत्रिका मिळवणेही या प्रणालीतून शक्य होणार आहे. ऑनलाइन अर्ज करताना ओळख व पत्त्याचा पुरावा म्हणून आधार कार्ड,.Ration Card Verification: रेशन कार्डमधील आठ हजार संशयास्पद नावे वगळणार. मतदार ओळखपत्र, वीज बिल किंवा भाडेकरारनामा यांची स्कॅन प्रत आवश्यक आहे. सदस्याचे नाव वाढवण्यासाठी जन्म दाखला किंवा मूळ शिधापत्रिकेतून नाव कमी केल्याचा दाखला सादर करावा लागणार आहे..तसेच उत्पन्नाचा दाखला किंवा स्वयंघोषणापत्र आणि कुटुंबप्रमुखाच पासपोर्ट आकाराचा फोटो आवश्यक आहे. हे डिजिटल इंडियाच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल असून यामुळे नागरिकांच वेळ आणि पैसा वाचणार आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.