Police Initiative: लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे बांधांचे व शेतरस्त्यांचे वाद सामंजस्याने मिटवण्यासाठी पोलिसांनी पुढाकार घेतला आहे. पोलिस दलाने त्यासाठी सुरु केलेल्या पोलिस शेतकऱ्यांच्या बांधावर या उपक्रमाचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होत असून मागील दहा दिवसात पोलिसांनी अनेक वर्षापासून प्रलंबित १०४ तंटे सामंजस्याने निकाली काढले आहेत. याचा फायदा मोठ्या संख्येने शेतकऱ्यांना झाला असून पोलिसांच्या पुढाकाराचे शेतकऱ्यांमध्ये मोठे कौतुक होत आहे..शेत जमिनीची हद्द, बांध व शेतरस्त्यांच्या वादामुळे शेती व्यवसायाला अडचणी येत आहेत. अनेक शेतकरी या वादामुळे त्रस्त असून त्यांना शेती करणे जिकरीचे झाले आहे. शेतकऱ्यांचे मोठ्या संख्येने वाद वर्षानुवर्षे प्रलंबित असून हे वाद काही ठिकाणी विकोपाला गेले आहेत. यात पाठबळ नसल्याने अनेक शेतकरी वादात एकाकी पडले आहेत. शेतकऱ्यांची ही बिकट परिस्थिती ओळखून पोलिस अधिक्षक अमोल तांबे यांनी १६ मार्चपासून पोलिस शेतकऱ्यांच्या बांधावर उपक्रम हाती घेतले आहे..Farmer Expectations: आंबा, काजू बागायतदारांचे शासन निर्णयाकडे लक्ष.या उपक्रमात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पोलिसांकडून बांधाची व रस्त्याची भांडणे सामंजस्याने निकाली काढण्यात येत आहेत. अनेक वर्षापासून वाद असल्याने शेतकऱ्यांमध्ये संवाद नव्हता. उपक्रमामुळे शेतकऱ्यांमध्ये संवाद घडवून आणण्यात पोलिसांना यश येत आहे. प्रत्यक्ष मोजणी करून व कागदपत्रे तपासून शेतकऱ्यांना जाग्यावरच न्याय दिला जात आहे. काही ठिकाणी रस्ताही तयार करून देण्यात येत आहे. पोलिसांकडून सामंजस्याने प्रकरणे निकाली काढण्यात येत असल्याने वाद न होता शेतकऱ्यांत मनोमीलन घडून येत आहे. .हा उपक्रम केवळ वाद निवारणा करण्यापुरता मर्यादित नसून, ग्रामीण भागात विश्वास निर्माण करणारा, संवेदनशील व परिणामकारक पोलिसिंगचा आदर्श नमुना ठरत आहे. जमीन व शेतीसंदर्भातील वाद असलेल्या शेतकऱ्यांनी संबंधित पोलिस ठाण्याशी संपर्क साधून या उपक्रमाचा लाभ घ्यावा व सामंजस्याच्या माध्यमातून वाद मिटविण्यास पुढाकार घ्यावा, असे आवाहन पोलिस अधीक्षक तांबे यांनी केले आहे.. Farmer Demand: ‘नियमित कर्ज भरणारा शेतकरी कायम अन्यायाच्या छायेत’.दहा वर्षांपासूनचा रस्त्याचा वाद मिटलाभोसा (ता. औसा) येथील शेतकरी शंकर रंगराव खोसे, भीमराव रंगराव खोसे व लक्ष्मण व्यंकट खोसे यांच्यात ८ ते १० वर्षांपासून शेतरस्त्याचा वाद सुरू होता. या वादातून न्यायालयीन प्रक्रिया, तहसीलदार स्तरावरील सुनावणी, पोलिस ठाण्यात तक्रारी तसेच उपोषण व आत्मदहनाचे निवेदन देण्यात आले होते. तरीही वाद निकाली निघत नव्हता. तहसीलदार सौदागर तांदळे, मुरूडचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अशोक उजगरे, पोलिस व महसूल कर्मचारी, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व स्थानिक प्रतिष्ठित नागरिकांनी शेतात जाऊन हा वाद मिठवला. .पाच तासाच्या चर्चेनंतर शेतरस्ता व नाली तयार करून देण्यात आली. नेहरुनगर (ता. रेणापूर) शिवारातील शेतकरी सोमनाथ रमेश भोसले यांनी दहा फूट रुंदीच्या शेतरस्त्यासाठी अनेकदा तक्रार दिली. त्यावरून वारंवार वाद, भांडणे व पोलिस तक्रारी होत होत्या; मात्र तोडगा निघत नव्हता. उपक्रमात पोलिस निरीक्षक सुधाकर देडे यांनी जाग्यावर जाऊन सामोपचाराने वाद मिटवला. अनेक वर्षांपासून सुरू असलेला वाद संपुष्टात येऊन शेतकरी कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.