Latur News: पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील आपत्ती व्यवस्थापनातील देशातील सर्वोच्च संस्था असलेल्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पथकाने गुरुवारी (ता. १२) सप्टेंबरमधील अतिवृष्टी व पुरपरिस्थितीमुळे बाधित झालेल्या भूम व परंडा तालुक्यांतील गावांची पाहणी केली. .अतिवृष्टी व पुरासारख्या आपत्तीनंतर झालेले नुकसान, त्याचे परिणाम व आपत्ती निवारणासाठी तातडीच्या व दीर्घकालीन गरजांचे मुल्यांकन करण्यासाठी जिल्ह्यात सी. पी. मोहन यांच्या नेतृत्वाखाली हे पथक दाखल झाले असून पथकातील शेती, घरकुल व अन्य विषयातील तज्ज्ञांनी बाधित शेतकरी व नागरिकांसोबत चर्चा करून माहिती घेतली. आपत्तीमुळे झालेल्या जमीन, पशुधन, घरे व सार्वजनिक मालमत्तांच्या नुकसानीची पाहणी पथकाने केली..Crop Damage Inspection : अतिवृष्टीग्रस्त भागांत केंद्रीय राज्यमंत्री जाधवांकडून पाहणी.प्राधिकरणाच्या वतीने आपत्तीनंतरच्या नुकसान, तोटा आणि गरजांचे मूल्यांकन (पीएनडीए) करणे, आपत्तीचे भौतिक परिणाम, नुकसान आणि तोट्याचे आर्थिक मूल्य, बाधितांना अनुभवलेले मानवी परिणाम, पुर्नवर्सनासाठी तातडीच्या व दीर्घकालीन गरजा आणि या गरजांचा प्राधान्यक्रम, याची माहिती संकलित केली जाते. .Crop Damage Inspection : नुकसानीनंतर नेते पोहोचले शेतकऱ्यांच्या बांधावर.या माहितीआधारे तयार करण्यात अहवालावरून राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जिल्हा प्राधिकरणाला सल्ला देते. पथकाने गुरुवारी चिंचपूर (ढगे, ता. भूम) गावाजवळ भारत मोरे, चंद्रकांत मोरे व अमरसिंह ढगे यांच्या पुराने नुकसान झालेल्या शेतीची माहिती घेतली. पाण्याचा मोठा प्रवाहामुळे पिके, जमीन व बांधबंदिस्तीचे नुकसान पाहून शेतकऱ्यांशी संवाद साधला व अडचणी जाणून घेतल्या. .कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्याचे तसेच वालवड येथील पाझर तलावाचे पुरामुळे झालेले नुकसानही पथकाने पाहिले. बेलगाव (ता. भूम) येथील विश्वनाथ दातखिळे यांच्या गोठ्यात बांधलेल्या १८ गाई पुरात मृत्युमुखी पडल्या, तर वीस शेळ्या पुरात वाहून गेल्या. जनावरांचा चारा, दूध काढण्याची मशिन, गोठा, शेणखत व कडबा कटरही पुरामुळे वाहून गेल्याची व्यथा दातखिळे यांनी पथकासमोर मांडली. आवार पिंपरी (ता. परंडा) गावाला पथकातील सदस्या आशा राणी व मिकी मेकॉन डलबेरा यांनी भेट देऊन गावाजवळून वाहणाऱ्या उल्फा नदीच्या पुरामुळे बाधित शाळा, अंगणवाडी इमारत व ग्रामपंचायतीच्या आरओ प्लांटची पाहणी केली..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.