Latur / Dharashiv News : दोन्ही जिल्ह्यांपैकी पीककर्ज वाटपात लातूर जिल्ह्याची गाडी सुसाट असून जिल्ह्यात आतापर्यंत उद्दिष्टाच्या ७६ टक्के कर्जवाटप झाले आहे. वीस दिवसांत जिल्ह्यात २० टक्के वाटप करून आघाडी घेतली तरी अनेक बँकांनी केलेले कर्जाचे कमी वाटप जिल्हा बँक, ग्रामीण बँक व भारतीय स्टेट बँकेने केलेल्या मोठ्या प्रमाणातील कर्ज वाटपामुळे झाकून गेल्याचे चित्र आहे. .धाराशिव जिल्ह्याचे वाटप ५५ टक्क्यांवरच स्थिरावले असून बँकांनी आखडलेला हात अजूनही ढिल्ला सोडलेला नाही. गेल्या वर्षी बँकांना सळो की पळो करून सोडलेल्याने लोकप्रतिनिधी व प्रशासनाचे यंदा कर्जवाटपाकडे लक्ष नसल्याने बँकांनी कर्जवाटपात पूर्वीप्रमाणे उदासीनता आणल्याचे चित्र आहे..धाराशिव जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत बँकांनी आतापर्यंत ३८ टक्के कर्जवाटप केले आहे. यात अग्रणी बँक असलेल्या भारतीय स्टेट बँकेने ५३ टक्के वाटप केले आहे. खासगी बँकांचे वाटप ३० टक्क्यांवर असून यातील इंदुसद बँकेने २०३ टक्के तर एचडीएफसी बँकेने ७२ टक्के वाटप केल्यामुळे टक्का वाढला आहे. .जिल्ह्यात बंधन बँक व डीसीबी बँकेने अद्याप एक रुपयाचे वाटप केले नाही. धाराशिव जिल्ह्यात कर्जवाटपाची गती मंद असून यंदा बँकांकडून उद्दिष्टानुसार कर्ज वाटपाच्या आशा मावळल्याचे चित्र जिल्ह्यात आहे. दरम्यान, महाराष्ट्र ग्रामीण बँकेने उद्दिष्टाच्या ९५ टक्के तर बँक ऑफ महाराष्ट्रने ७६ टक्के वाटप केल्यामुळे शेतकऱ्यांना काहीअंशी दिलासा मिळाला आहे. .Crop Loan : खानदेशात पीक कर्ज वितरणात राष्ट्रीयीकृत बँका मागे.बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक, पंजाब नॅशनल बँक, युको बँक व रत्नाकर बँकेचे वाटप वीस टक्क्यांच्या आत असून अन्य बँकांचे वाटप वीस ते ४० टक्क्यांदरम्यान आहे.लातूर जिल्ह्यात डेव्हलपमेंट क्रेडीट बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन ओव्हरसिज बँक, इंदुसिंद, एयू, इक्विटाज व कोटक महिंद्रा बँकेने सात बँकांनी अद्याप एक दमडाही कर्जाचे वाटप केले नाही. .धाराशिव जिल्ह्यात दोनशे टक्के वाटप करणाऱ्या इंदुसिंद, तर ५२ टक्के वाटप करणाऱ्या कोटक महिंद्रा बँकेने लातूर जिल्ह्याच कर्जवाटपात वेगळा न्याय ठेवल्याने शेतकऱ्यांना कोडे पडले आहे. आयडीबीआय, पंजाब नॅशनल बँक व युनियन बँक ऑफ इंडियाने उद्दिष्टाच्या केवळ एक टक्का तर बँक ऑफ इंडियाने दोन टक्के व कॅनरा बँकेने नऊ टक्के वाटप केले आहे..Crop Loan Target : ‘डीसीसी’कडून पीककर्जाचे उद्दिष्ट साध्य.बँक ऑफ महाराष्ट्रने १५९ कोटी १९ कोटीचे उद्दिष्ट घेऊन ४१ टक्के, इंडियन बँकेने २२ कोटी ५० लाखांपैकी २७ टक्के, एचडीएफसीने ३०, तर आयडीबीआय बँकेने ३८ टक्के कर्जाचे वाटप केले आहे. बँक ऑफ बडोदाने २४ कोटी २७ लाखाचे वाटप करून ३१ टक्क्यांचे उद्दिष्ट साध्य केले तर अॅक्सीस बँकेने २१ टक्के वाटप केले आहे..लातूर जिल्ह्यातील पीककर्ज वाटपखरीप हंगामातील उद्दिष्ट दोन हजार ४५८ कोटी १४ लाख रुपयेआतापर्यंतचे वाटप एक हजार ८६० कोटी १९ लाख (७६ टक्के)राष्ट्रीयकृत बँकांचे वाटप ५५९ कोटी २४ लाख (५६ टक्के)भारतीय स्टेट बँकेचे वाटप ४५६ कोटी (९८ टक्के)खासगी क्षेत्रातील बँकांचे वाटप ५२ कोटी २४ लाख (२० टक्के)महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे वाटप २४४ कोटी ४३ लाख (९२ टक्के)जिल्हा मध्यवर्ती बँकेचे वाटप एक हजार ४ कोटी २८ लाख (१०८ टक्के)कर्ज मिळालेले शेतकरी दोन लाख पाच हजार ४६९धाराशिव जिल्ह्यातील पीककर्ज वाटपखरीप हंगामातील उद्दिष्ट एक हजार ६५८ कोटी ५७ लाख रुपयेआतापर्यंतचे वाटप ९१२ कोटी ३१ लाख (५५ टक्के)राष्ट्रीयकृत बँकांचे वाटप १६८ कोटी २० लाख (३८.३० टक्के)भारतीय स्टेट बँकेचे वाटप २३१ कोटी ७६ लाख (५२.४७ टक्के)खासगी क्षेत्रातील बँकांचे वाटप ४५ कोटी ६ लाख (२९.९२ टक्के)महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे वाटप ३०२ कोटी ३० लाख (९४.४७ टक्के)जिल्हा मध्यवर्ती बँकेचे वाटप १६४ कोटी ९९ लाख (५३.७३ टक्के)कर्ज मिळालेले शेतकरी ८८ हजार ६४१.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.