Latur News: कबनसांगवी (ता. चाकूर) परिसरात रब्बी हंगामात पारंपरिक हरभरा पिकाला पर्याय म्हणून राजमा पिकाच्या लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढताना दिसत आहे. वाढता उत्पादन खर्च आणि अपेक्षित उत्पन्न न मिळाल्याने अनेक शेतकरी हरभऱ्याऐवजी राजमा पिकाची निवड करत आहेत..रब्बी हंगामात गहू, हरभरा आणि ज्वारी ही पारंपरिक पिके घेतली जातात. मात्र, हरभरा पिकासाठी लागणारी मेहनत, फवारणीचा खर्च आणि बाजारातील चढ-उतार यामुळे खर्चापेक्षा उत्पन्न कमी राहण्याची परिस्थिती निर्माण होत आहे. .Rajma Crop experiment: रब्बी हंगामात राजमा पिकाचा यशस्वी प्रयोग.याउलट राजमा पिकाला हरभऱ्याइतकीच मेहनत घेतली असता तुलनेने अधिक उत्पादन आणि समाधानकारक बाजारभाव मिळत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे..Rajma Farming: राजमा पिकात अन्नद्रव्ये, पीक संरक्षणावर भर.बाजारात राजमाच्या विविध जाती उपलब्ध असल्या तरी या भागात ‘वाघ्या’ आणि ‘वरुण’ या दोन जातींची लागवड प्रामुख्याने केली जाते. वाघ्या जातीचे उत्पादन तुलनेने कमी येते; मात्र बाजारभाव चांगला मिळतो. तर वरुण जातीचे उत्पादन अधिक असले तरी त्याला तुलनेने कमी दर मिळतो. राजमा पिकाचा कालावधी सुमारे ७५ ते ९० दिवसांचा आहे..एकरी नांगरणी, पाळी, पेरणी, खत, बियाणे, दोन ते तीन फवारण्या, कापणी व मळणी असा एकूण १५ ते १६ हजार रुपयांपर्यंत खर्च येतो. सरासरी १० ते १४ कट्टे उतारा मिळतो. सात ते दहा क्विंटल उत्पादन झाल्यास बाजारभाव ७ हजार ते साडे ९ हजार रुपयांपर्यंत मिळत असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. यांनी तीन एकर क्षेत्रावर ७५ कट्टे उत्पादन घेतले. तर कबनसांगवी येथील जनार्दन सूर्यवंशी यांनी ३० गुंठ्यांत ८ कट्टे आणि ४५ किलो बियाणे वापरून १४ कट्टे उत्पादन घेतल्याचे कुंभेवाडीचे शेतकरी तानाजी लवटे यांनी सांगितले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.