Latur Shetkari Protest News: शेतकऱ्यांना विनाअट सरसकट कर्जमुक्ती मिळावी व त्यांच्या हक्काची पीकविमा भरपाई मिळावी, यासाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी अन्नत्याग आंदोलन सुरु केले आहे. त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देताना क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने मंगळवारी (ता. १६) गांधी चौकात फसव्या कर्जमाफीच्या शासन निर्णयाची होळी करण्यात आली. .संघटनेचे प्रदेशाध्यक्ष राजीव कसबे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. सरकारने नुकताच कर्जमुक्तीचा शासन निर्णय काढला असून त्यात कर्जमाफीसाठी अनेक जाचक अटी व शर्थी घालण्यात आल्या असल्याने शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे. यामुळे या कर्जमाफीचा शेतकऱ्यांना काहीच फायदा होणार नाही. उद्योगपतीचे लाखों कोटींचे कर्ज विना अट माफ केले जात असताना दुसरीकडे शेतकऱ्यांना मात्र जाचक अटी घालून बाजूला ठेवण्याचे काम सरकारकडून सुरु आहे..Farmers Protest: कर्जमाफीवरून मुख्यमंत्र्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन.जाती जातीत भांडण, धर्मा धर्मात भांडण लावून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर एकत्र येऊ देऊ नये, असा डाव सरकार खेळत आहे, पीकविमा भरपाई नाही, शेतीमालाला भाव नाही, शेतकरी कर्जाला कंटाळून आत्महत्या करीत आहे, याचे सरकारला काहीही देणं घेणं राहिलेले नाही, अशी टीका या वेळी पदाधिकाऱ्यांनी केली..Farmer loan Waiver Policy: कर्जमाफी की कर्जवसुली?; नव्या योजनेवर शेतकऱ्यांत नाराजी.रविकांत तुपकर यांच्या बेमुदत अन्नत्याग आंदोलनाकडे सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. अशा परिस्थिती शेतकरी कष्टकरी एकजूट होऊन सरकारचे मनसुबे उधळून लावतील, लढाई आरपारची असेल, शेतकऱ्याच्या नादाला सरकारने लागू नये, असा इशारा आंदोलकांनी या वेळी दिला..आंदोलनात सत्तार पटेल, राजेंद्र मोरे, अरुण कुलकर्णी, नवनाथ शिंदे, प्रज्योत हुडे श्याम जाधव, सतीश राठोड, इमाम सय्यद, विशाल ढोबळे, बालाजी सूर्यवंशी, गौतम कांबळे, दत्ता किणीकर, आदेश कसबे, बालाजी होळ पाटील, मारुती कसबे, धनराज घुटे, सावन गवळी, शिवाजी कसबे, प्रवीण गायकवाड, सतीश चोरमले, एम. एम. जगताप, बबलू शेख, आकाश घुटलकर यांच्यासह शेतकरी सहभागी झाले होते..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.