Maharashtra Cooperative Bank Election: लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या १५ जागांसाठी रविवारी (ता. १५) मतदान होत आहे. बँकेचे ९९९ मतदार या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावणार असून जिल्ह्यातील दहा केंद्रावर सकाळी आठ ते दुपारी चार या वेळेत मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. .दरम्यान, १९ पैकी ४ जागांवरील उमेदवार बिनविरोध निवडून आले असले तरी राखीव मतदारसंघासाठी बिनविरोध निवडणूक झालेल्या तीन सोसायटी मतदारसंघातील मतदारांना मतदान करावे लागणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके यांनी सांगितले..या निवडणुकीत सत्ताधारी पॅनेलच्या विरोधात माजीमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी महायुतीचे पॅनेल उभा करून चांगलीच चुरस निर्माण केली आहे. बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक जाहिर झाल्यानंतर औसा सोसायटी मतदारसंघातून आमदार अभिमन्यू पवार यांच्या पत्नी शोभा पवार, रेणापूर सोसायटी मतदारसंघातून सर्जेराव मोरे, अहमदपूर सोसायटी मतदारसंघातून अविनाश जाधव तर अनुसूचित जाती किंवा जमाती मतदारसंघातून विवेक हरिश्चंद्र सिरसाठ हे बिनविरोध निवडून आले आहेत..Gokul Chairman Election: गोकुळची सत्ता 'महायुती'कडे, राजेश पाटील यांची अध्यक्षपदी निवड.उर्वरित महिला प्रतिनिधी व इतर मागासवर्गीय मतदारसंघात तिरंगी तर १३ मतदारसंघात दुरंगी लढती आहेत. एकास एक उमेदवार असलेल्या नागरी बँका व पतसंस्था मतदारसंघात आमदार रमेशअप्पा कराड यांचे पुत्र ऋषिकेश व विद्यमान संचालक अशोक गोविंदपूरकर यांच्यात तर निलंगा सोसायटी मतदारसंघात अरविंद पाटील निलंगेकर व विद्यमान संचालक अशोक पाटील निलंगेकर यांच्या पत्नी संगीता पाटील निलंगेकर या चुलती पुतण्यांत चुरशीची लढत होत आहे..मार्केटिंग सोसायटी मतदारसंघात भरत चामले यांचा अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने वैध ठरवल्यामुळे विद्यमान अध्यक्ष धीरज देशमुख यांच्या मतदारसंघाचीही निवडणूक होत आहे. बिनविरोध निवडून आलेले चारपैकी तीन उमेदवार हे सत्ताधारी पॅनेलचे असून औशाच्या शोभा पवार या महायुतीच्या पॅनेलच्या असल्याचा दावा भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार बस्वराज पाटील यांनी केला. आमदार पवार यांनी याबाबत मौन बाळगल्याने संभ्रम निर्माण झाला आहे..Solapur Bank Election: माजी आमदारांसह १० नेत्यांचे अर्ज बाद; वारसदार उतरणार आता मैदानात.बँकेचे विद्यमान संचालक सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी महायुतीच्या पॅनेलची साथ सोडून सत्ताधारी पॅनेलमध्ये प्रत्यक्ष सहभागी होत प्रचार सुरु केला आहे. बँकेच्या कारभाराबद्दल अनेक प्रश्न उपस्थित करून अरविंद पाटील निलंगेकर यांनी सत्ताधारी पॅनेलची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. त्यावर सावध भूमिका घेत आणि प्रसंगी प्रश्नांकडे दुर्लक्ष करत सत्ताधारी पॅनेलने मतदारांवर लक्ष केंद्रित केले आहे..निवडणुकीच्या निमित्ताने मतदारांच्या पळवापळवीसोबत अनेक घडामोडींनी जिल्ह्याच्या राजकारणात उलथापालथ झाली. निवडणुकीत मतदारांची कमी संख्या कोणाच्या पथ्यावर पडते व मतदार कोणाच्या मागे आहेत, हे सोमवारी (ता. १६) होणाऱ्या मतमोजणीनंतरच कळून येणार आहे..दहा तालुका ठिकाणी मतदानमतदान प्रक्रियेसाठी जिल्ह्यातील लातूर, औसा, रेणापूर, निलंगा, शिरूर अनंतपाळ, देवणी, अहमदपूर, चाकूर व जळकोट येथील तहसील कार्यालयांमध्ये तसेच उदगीर येथील प्रशासकीय भवन इमारतीचा तळमजला येथे अशा एकूण दहा मतदान केंद्रांवर ही मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. प्रक्रिया शांततेत पार पडण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी मतदान केंद्र परिसरात कलम १६३ लागू करण्याचे आदेश निर्गमित केले आहेत. त्यानुसार सकाळी सहापासून ते मतदानाची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मतदान केंद्रांच्या ठिकाणापासून २०० मीटरच्या परिसरात पाच किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.