Latur News : जिल्ह्यामध्ये प्रामाणिक व शिस्तीने सहकाराची चळवळ रुजली आहे. त्यात लातूर जिल्हा बँक ही या चळवळीचा आत्मा आहे. सहकार चळवळीतील कामांचा गौरव म्हणून लातूर येथे सहकार विभागाकडून लवकरच सहकार भवन उभारण्यात येणार आहे, अशी माहिती बँकेचे संचालक तथा सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिली..बँकेच्या ४२ व्या व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. माजीमंत्री दिलीपराव देशमुख, बँकेचे अध्यक्ष धीरज देशमुख, माजी आमदार वैजनाथ शिंदे, संचालक अशोकराव पाटील निलंगेकर, राज्य साखर संघाचे सदस्य आबासाहेब पाटील, बँकेचे उपाध्यक्ष अॅड. प्रमोद जाधव, माजी अध्यक्ष यशवंतराव पाटील, बाजार समिती सभापती जगदीश बावणे, मांजरा साखर कारखान्याचे उपाध्यक्ष अशोकराव काळे, रेणा कारखान्याचे अध्यक्ष अनंतराव देशमुख यांची या वेळी प्रमुख उपस्थिती होती. .सहकारमंत्री पाटील म्हणाले, ``जिल्हा बँकेने केलेली वाटचाल ही निश्चितच कौतुकास्पद आहे. काळ कितीही बदलत गेला तरी बँक आपल्या कर्तव्यापासून थोडीही हटली नाही. यामुळे टीका करणाऱ्यांनीनी बँकेच्या वाटचालीचा बारकाईने अभ्यास करावा. बँकेच्या विविध योजनांचा लाभ घेऊन अनेक जण यशस्वी जीवन जगत आहेत. .Latur DCC Bank : लातूर जिल्हा बँकेकडून तब्बल १९ कोटींचे धनादेश प्रदान.लोकांचा सामाजिक व आर्थिक स्तर उंचावण्याचे काम बँकेने सातत्याने केले आहे.`` कधीकाळी अवसायनात निघालेली लातूर जिल्हा बँक आज यशाच्या शिखरावर असून आजपर्यंतच्या वाटचालीत शेतकऱ्यांप्रति बांधिलकी व सेवाभाव जोपासून जिल्ह्याच्या विकासात बँकेने मोलाचे योगदान दिल्याचे माजीमंत्री देशमुख म्हणाले..या वेळी त्यांनी बँकेचे कर्मचारी व गटसचिवांना दिवाळीनिमित्त पंचेवीस टक्के बोनस त्यांनी जाहीर करत बोनस पोटी कर्मचाऱ्यांना ११ कोटी ६८ लाखाचा लाभ होणार असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यकारी संचालक एच. जे. जाधव यांनी सभेतील विषयांचे वाचन केले. सचिन सूर्यवंशी व सुनील पाटील यांनी सूत्रसंचालन केले..Latur DCC Bank : लातूर जिल्हा बँकेची कर्जवसुलीत आघाडी.शेतकऱ्यांसाठी उद्दिष्टापेक्षा जास्त कर्ज४२ वर्ष मागे वळून पाहिले तर जिल्हा बँक कुठे होती व आज कुठे पोहोचली, याचा विचार केल्यावर बँकेच्या यशस्वी वाटचालीचे गमक लक्षात येईल. शेतकरी हित जोपासत बँकेने कधीच उद्दिष्ट व अन्य गोष्टीची चौकट पाहिली नाही. वर्षानुवर्षे उद्दिष्टापेक्षा किती पटीने जास्त पीक कर्जाचे वाटप केले. पाच लाखापर्यंतच्या कर्जासाठी बिनव्याजी कर्ज योजना राबवली. .त्याचा अनेक शेतकऱ्यांनी लाभ घेतला आहे. मागील आर्थिक वर्षात बँकेला नऊशे कोटीचे उद्दिष्ट शासनाकडून दिले असताना एक हजार ५५४ कोटीचे म्हणजे उद्दिष्टाच्या १५४ टक्के वाटप केले. बँकेच्या वाटचालीत विविध कार्यकारी सोसायटी, गट सचिव व कर्मचाऱ्यांचा मोलाचा वाटा आहे. बँकेने ऑनलाइन बँकिंग प्रणाली सुरू आदर्श निर्माण केला असल्याचे अध्यक्ष देशमुख यांनी सांगितले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.