Latur/Dharashiv News : दोन्ही जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे खरिपातील प्रमुख पीक असलेले सोयाबीन व अन्य पिके सात दिवसापासून पाण्याखाली तर कुठे पाण्यात आहे. यामुळे या पिकांना जाग्यावर कोंब फुटत असून बहरात आलेल्या सोयाबीनपासून मोठ्या उत्पनाच्या आशेवर पावसाने शेतकऱ्यांच्या डोळ्यात देखत पाणी फिरवले आहे. या पावसाने रविवारी (ता. २८) काही भागात उघडीप दिली तरी त्याची शेतकऱ्यांमध्ये धास्ती कायम आहे. .दरम्यान लातूर जिल्ह्यात रविवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या मागील चोवीस तासात सरासरी २५.४ मिलिमीटर पाऊस झाला असून चार मंडळात अतिवृष्टी झाली असून अहमदपूर तालुक्यातील तीन मंडळात ६७. ३ मिलिमीटर पाऊस झाला. तर साकोळ मंडळात ६६ मिलिमीटर पाऊस झाला. धाराशिव जिल्ह्यात ३९ मिलिमीटर पाऊस झाला असून सात मंडळात अतिवृष्टी झाली आहे. यात वाशी तालुक्यातील तीनही मंडळात अतिवृष्टी असून सर्वाधिक १३१.५ पाऊस सलगरा (ता. तुळजापूर) मंडळात झाला आहे. .लोहारा तालुक्यात निम्म तेरणा प्रकल्पात शनिवारी (ता. २७) वाहून गेलेले बालाजी त्र्यंबक मोरे (रा. नागूर) यांचा मृतदेह रविवारी शोध व बचाव पथकाला सापडला. दोन्ही जिल्ह्यात पावसाने उघडीप दिल्यामुळे शोध व बचाव कार्य थांबले आहे. शनिवारी लातूर जिल्ह्यात आठ जणांना रेस्क्यू करण्यात तर ४६२ नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. .Pomegranate Crop Damage : सांगली जिल्ह्यात डाळिंबाचे नुकसान.पाणी पातळी कमी झाल्यामुळे बहुतांश रस्ते व पूल पुन्हा वाहतुकीसाठी खुले झाले असून पूर परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात व परिस्थिती सर्वसामान्य आहे. पूर ओसरल्याने जनजीवन पूर्वपदावर येत आहे. ऑगस्टमध्ये ३३ टक्क्यापर्यंत नुकसान झालेल्या पिकांना भरपाई मंजूर झाली आहे. सप्टेंबरमध्ये राहिलेल्या पिकांचेही नुकसान झाले आहे. यामुळे ३३ टक्क्याच्या पुढे ७५ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसानीची भरपाई देण्यासाठीही शासनाने कार्यवाही करावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत..लातूर जिल्ह्यात २५.४ मिमीजिल्ह्यात शनिवारी (ता. २७) सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत सरासरी २५.४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. या पावसाळ्यातील हा सर्वाधिक पाऊस असून पावसाने विक्रम केल्याची चर्चा शेतकरी करत आहेत. यामध्ये अहमदपूर तालुक्यात सर्वाधिक १३८ मिलिमीटर, तर निलंगा तालुक्यात सर्वात कमी ५३.७ मिलिमीटर पाऊस झाला आहे. तालुकानिहाय पावसाची आकडेवारी मिलिमीटरमध्ये पुढीलप्रमाणे आहे. लातूर- २१.६, औसा - १३.३, अहमदपूर - ४६.५, निलंगा - १६.८, उदगीर -२५.३, चाकूर - ३३, रेणापूर - २०.१, देवणी - २८.१, शिरूर अनंतपाळ - ५१.१ आणि जळकोट - १०.२.Crop Damage Survey : ढोल-डफ वाजवित केले अधिकाऱ्यांचे स्वागत.धाराशिव जिल्ह्यात ३९ मिलिमीटर पाऊसजिल्ह्यात शनिवारी सकाळी आठ वाजेपर्यंत मागील चोवीस तासात सरासरी ३९ मिलिमीटर पाऊस झाला आहे. तालुकानिहाय पडलेला पाऊस मिलिमीटरमध्ये पुढीलप्रमाणे आहे. जिल्ह्यात धाराशिव - २६.६, तुळजापूर - ५१.३, परंडा - ३९.६, भूम - ५५.१, कळंब - ४८.८, उमरगा - ११.३, लोहारा - ११, वाशी - ६९.६.निलंगा तालुक्यात पावसाचे तांडवकाही दिवसांपासूच्या संततधार पाऊस व अतिवृष्टीमुळे निलंगा तालुक्यात पिकाचे शंभर टक्के नुकसान झाले आहे. पावसाच्या या तांडवामुळे शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा चक्काचूर झाला आहे. यंदा चांगला आलेला खरीप हंगाम पूर्णत: गेला असून मांजरा व तेरणा नदीकाठच्या शेतकऱ्यांचेही पिके व जमीन खरडून गेली आहे. पिकांचे मोठे नुकसान झाल्यामुळे भरपाईसाठीची हेक्टरी मर्यादा दोन हेक्टरवरुन वाढवून जास्त करावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत. औराद शहाजानी येथे मांजरा व तेरणा नदीचा संगम असल्यामुळे याभागात सर्वाधिक नुकसान या ठिकाणी झाले आहे. .निलंगा तालुक्यात तुरीचे क्षेत्र २२ हजार २८२ हेक्टर असले तरी प्रत्यक्षात पेरा १० हजार ५२२ हेक्टरवरती झाला आहे. यंदा तुरीचे क्षेत्र निम्म्या प्रमाणात घटले आहे. मुगाचे क्षेत्र एक हजार असले तरी एक हजार २१५ हेक्टर वरती पेरा झाला आहे. उडीद एक हजार ११० हेक्टर पेरा असला तरी एक हजार १६१ हेक्टर वरती प्रत्यक्ष पेरा झाला आहे. यंदा उडीद पिकाचा पेरा वाढला होता. सर्वाधिक पेरा असणाऱ्या सोयाबीन पिकाचे क्षेत्र 69 हजार ५११ हेक्टर असून प्रत्यक्ष पेरा ६० हजार ३३५ हेक्टर वरती झाला असून पाच हजार हेक्टरने सोयाबीनचे क्षेत्र घटले आहे. या स्थितीत अतिवृष्टीमुळे सर्वच पिके हातून गेल्याचे शेतकरी सांगत आहेत. पाऊस लवकर उघडला नाही तर त्याचा परिणाम रब्बी हंगामावरही होण्याची भीती शेतकऱ्यांना आहे..यावर्षी सुरुवातीपासूनच चांगला पाऊस पडत गेल्यामुळे सोयाबीनचे पीक बहरात होते. पीक पाहून मनाला मोठा आनंद मिळत होता. पिकाला कोणाची नजर लागू नये, अशी भावना होती तर त्यातून उत्पन्नाच्या मोठ्या आशा होत्या आणि आशेवर काही स्वप्नही पाहिली होती. परतीच्या पावसाच्या तडाख्यात पीक सापडू नये म्हणून लवकरच काढणीला येणारे वाण पेरले होते. एका झाडाला शंभरपर्यंत शेंगा लागल्या होत्या. मात्र, पावसाने होत्याचे नव्हते केले. पाच दिवसापासून सोयाबीन पाण्यात असून पिकाला जाग्यावर कोंब फुटत आहे. डोळ्यात देखत आशा व स्वप्नांवर पाणी फेरले गेले.- बाबासाहेब भिसे, (बोरगाव काळे, ता. लातूर).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.