Rainfall Update: लातूर, धाराशिव जिल्ह्यांत मागील तीन दिवसापासून सुरु असलेल्या पावसात गुरुवारी (ता. ३०) दुपारपासूनच चांगला जोर आला. रात्रभर पाऊस कोसळत राहिला. यातूनच नदी नाल्यांना पाणी येऊन तलावातील पाणीसाठा वाढण्यास सुरुवात झाली. धनेगाव (ता. केज) येथील मांजरा धरणात पावसाचे पाणी दाखल होऊन साठ्यात वाढ होऊ लागली. यात गुरुवारी रात्रीच्या पावसाने लातूर जिल्ह्यातील पाच तर धाराशिव जिल्ह्यातील तीन मंडलांत अतिवृष्टीची नोंद झाली. .पावसामुळे खरिपातील पिकांना चांगलेच जीवदान मिळाले असून राहिलेल्या पेरण्याही आता पूर्ण होणार आहेत. दोन्ही जिल्ह्यातील मागील तीन दिवसापासून पाऊस सुरु आहे. तुलनेने लातूर जिल्ह्यात चांगला पाऊस सुरु आहे. गुरुवारी पावसाने सातत्य ठेवत चांगलाच दणका दिला. दुपारपासून सुरु झालेला पाऊस रात्रभर पडत होता. हवामान विभागाने दमदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवली होती. ती खरी ठरली. .Heavy Rainfall: सांगली जिल्ह्यात पावसाची जोरदार हजेरी.यात लातूर जिल्ह्यातील अहमदपूर व खंडाळीत प्रत्येकी ६६.३ मिलीमीटर, नळेगाव - ६२, मोघा - ७६.५, जळकोट - ६७.८ तर धाराशिव जिल्ह्यातील कळंब मंडळात ७५, ईटकूर - ६६ व शिराढोण मंडळात ७० मिलिमीटर पावसासह अतिवृष्टीची नोंद झाली. जिल्ह्यात शुक्रवारी (ता. ३१) सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत सरासरी ४५.२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे..Sangli Rain Update: सांगली जिल्ह्यात अधूनमधून हलका पाऊस.लातूर जिल्ह्यातील तालुकानिहाय पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे ः लातूर - ४९.४, औसा - ३५.४, अहमदपूर - ५४.१, निलंगा - ३५.२, उदगीर - ५७.४, चाकूर - ४२.९, रेणापूर - ३२.८, देवणी - ५५.२, शिरूर अनंतपाळ - ५१.८ आणि जळकोट - ५९.९ मिलीमीटर..धाराशिव जिल्ह्यात तालुकानिहाय पडलेला पाऊस पुढीलप्रमाणे ः धाराशिव - ३७, तुळजापूर- १८.६, परंडा - ३९.६, भूम - ३१.५, कळंब - ६१.१, उमरगा - २६.१, लोहारा - २३.४ व वाशी - ४९.१ मिलीमीटर. धाराशिव जिल्ह्यात ३१ जुलै रोजी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासात सरासरी ३५.७ मिलिमीटर पाऊस झाला..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.