Pune News: ‘सीसीआय’च्या हमीभाव कापूस खरेदीचा शुक्रवार (ता. १३) शेवटचा दिवस असणार आहे. ‘सीसीआय’ने कापूस खरेदीला १५ मार्चपर्यंत मुदतवाढ दिली होती. परंतु सुट्ट्यांमुळे या मुदतवाढीच्या कालावधीत बहुतांशी केंद्रांवर प्रत्यक्षात केवळ सहा दिवसच कापूस खरेदी झाली. .अनेक शेतकऱ्यांना कापूस देता आला नाही. तसेच स्लाॅट बुक करण्यातही अडचणी येत आहेत. त्यामुळे कापूस खेरदीला ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ द्यावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत. ‘सीसीआय’ने देशात आतापर्यंत १०४ लाख गाठी कापूस खरेदी केला आहे. गेल्या वर्षीपेक्षा यंदाची खरेदी चार टक्क्यांनी जास्त आहे..CCI Cotton Procurement: सीसीआयची कापूस खरेदी मुदतवाढ नावापुरती; अकोट बाजार समितीकडून चौकशीची मागणी.यापूर्वी सीसीआयने २०१९-२० मध्ये विक्रमी १०० लाख ५ हजार गाठींची खरेदी होती. तर मागील हंगामात १०० लाख गाठींची खरेदी झाली होती. यंदाच्या खरेदीची अंतिम आकडेवारी बाहेर आल्यानंतर ती आतापर्यंतची विक्रमी खरेदी ठरण्याची शक्यता आहे..तेलंगणात सर्वाधिक खरेदीयंदाही तेलंगणात सर्वाधिक ३१ लाख ७० हजार गाठी कापूस खरेदी झाला आहे. तर महाराष्ट्रात २७ लाख १३ हजार गाठी कापसाची खरेदी झाली आहे. गुजरातमध्ये २० लाख गाठींची खरेदी करण्यात आली. कर्नाटकात ७ लाख गाठी, मध्य प्रदेशात ५ लाख ५५ हजार गाठी, आंध्र प्रदेशात ४ लाख गाठी, राजस्थानमध्ये ३ लाख ४६ लाख गाठींची खरेदी झाली आहे. तसेच ओडिशाता २ लाख ७० हजार गाठी, हरियाना २ लाख गाठी आणि पंजाबमध्ये ४७ हजार गाठी कापसाची खरेदी झाली आहे..CCI Cotton Procurement: कापूस खरेदीसाठी आता १५ मार्चपर्यंत मुदतवाढ.‘सीसीआय’ची कापूस विक्री‘सीसीआय’ने यंदा जानेवारी महिन्यातच कापसाची विक्री सुरू केली. तसेच कापसाचा भावही तीन वेळा कमी केला. आतापर्यंत सीसीआयने यंदाच्या हंगामातील १७ लाख ३५ हजार गाठी कापसाची विक्री केली आहे. याचा दबाव खुल्या बाजारावर आहे..सहा दिवसच खरेदीसीसीआयने २७ फेब्रुवारीपासून कापूस खरेदी बंद केली होती. त्यानंतर कापूस खरेदीला १५ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. मात्र सुट्ट्यांमुळे प्रत्यक्ष खरेदी पाच मार्चपासून सुरू झाली. त्यातही सात आणि आठ मार्च रोजी अनुक्रमे शनिवार, रविवार असल्याने सुट्टी होती. तसेच आता १४ आणि १५ मार्चलाही शनिवार, रविवारमुळे खरेदी बंद राहणार आहे. त्यामुळे शुक्रवार (ता.१३) हमीभावाने कापूस खरेदीचा शेवटचा दिवस असणार आहे. मुदतवाढीच्या कालावधीत प्रत्यक्षात सहा दिवसच खरेदी सुरू राहिली..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.