Nashik News : : लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेल्या सप्ताहात ८ ते १६ हजार क्विंटलदरम्यान आवक झाली. बुधवारी (ता. १५) कांद्याची आवक १६३३४ क्विंटल झाली होती. त्यास प्रति क्विंटल किमान ४०० तर कमाल १४०० रुपये असा दर मिळाला. सर्वसाधारण दर १०५० रुपये होता, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली..गेल्या तीन दिवसांपासून पुन्हा आवक कमी झाली आहे. आवक कमी जास्त होत असून दर स्थिर असल्याची स्थिती आहे. उत्पादन खर्चाच्या तुलनेत सध्या दरासाठी प्रतीक्षा आहे. मंगळवारी (ता. १४) आवक १५,८६२ क्विंटल झाली. त्यास ६०० ते १५०० असा प्रति क्विंटल दर मिळाला. .सर्वसाधारण दर १०६० रुपये होता. सोमवारी (ता. १३) आवक १४५८५ क्विंटल झाली. त्यास ५०० ते १५०० प्रति क्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर ११०० होता. शनिवारी (ता. ११) आवक ८१३८ क्विंटल झाली. त्यास ५०० ते १३५१ असा दर मिळाला..Onion Farmer Support: कांद्याच्या भविष्यासाठी प्रोत्साहन द्या, बियाणे निर्यातीवर बंदी घाला.सर्वसाधारण दर १०७५ होता. शुक्रवारी (ता. १०) आवक १४३१६ क्विंटल झाली. त्यास ५०० ते १४८० असा दर मिळाला. सर्वसाधारण दर १०५० होता. गुरुवारी (ता. ९) आवक १२७०० क्विंटल झाली. त्यास ५०० ते १४७० असा दर मिळाला..Onion Crisis: कांदा सडल्याने उत्पादक संकटात.सर्वसाधारण दर १०८० होते. पिंपळगाव बाजार समितीमध्ये सर्वाधिक आवक आहे. येथे बुधवारी (ता. १५) १७४१८ क्विंटल आवक झाली. त्यास सरासरी १,१०० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. जिल्ह्यात नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत सरासरी प्रति क्विंटल ८०० रुपये दर मिळाला. .उमराणे येथे १६५०० क्विंटल आवक झाली. त्यास सरासरी १००० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. तर नाशिक, देवळा, सटाणा, चांदवड, मनमाड, कळवण, सिन्नर येथेही आवक होत आहे. त्यास सरासरी ८५० ते १०५० दरम्यान सरासरी दर मिळाले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.