Crop Sale Issues: लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवारी (ता. १३) नवीन आणि जुन्या व्यापाऱ्यांमधील वादामुळे मका व सोयाबीनचे लिलाव ठप्प झाले. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी लासलगाव-विंचूर चौफुलीवर सुमारे तासभर रास्ता रोको आंदोलन केले..सोमवारी (ता. १३) लिलाव सुरू असताना बाजार समितीचे नवीन परवानाधारक व्यापारी प्रक्रियेत सहभागी झाले. त्यांनी स्पर्धात्मक बोली लावल्याने शेतीमालाचे दर वाढले. मात्र नव्या व्यापाऱ्यांच्या सहभागाला जुन्या व्यापाऱ्यांच्या असोसिएशनने कडाडून विरोध करत लिलावावर बहिष्कार टाकला. अचानक लिलाव बंद पडल्याने सकाळपासून माल घेऊन आलेल्या शेतकऱ्यांचा संयम सुटला..APMC Trader License Suspension: सोलापूर बाजार समितीतील १९ अडत्यांचे परवाने रोखले.‘‘नव्या व्यापाऱ्यांमुळे मालाला चांगला भाव मिळत असताना जुन्या व्यापाऱ्यांनी अडवणूक का करावी?’’ असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला. बाजार समिती प्रशासनाकडून ठोस तोडगा न निघाल्याने शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले. यावेळी सोयाबीनला प्रति क्विंटल ५८०० रुपयांपर्यंत भाव मिळाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. प्रशासनाने नवीन व्यापाऱ्यांना कायमस्वरूपी संरक्षण द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली..Insurance Claim Rejection: भरपाई नाकारणे विमा कंपनीला पडले महागात.यापूर्वी हे व्यापारी आडत्यांमार्फत खरेदी करत होते; मात्र सोमवारी त्यांनी कोणतीही सूचना न देता थेट वैयक्तिक खरेदी सुरू केली. या प्रकाराला असोसिएशनचा विरोध आहे. त्यांनी प्रचलित पद्धतीने खरेदी सुरू ठेवावी, यास असोसिएशनची हरकत नाही. त्यांचा अर्ज प्राप्त झाला असून, प्रलंबित अर्जांसह एकत्रित विचार करून काही दिवसांत निर्णय घेतला जाईल.- नितीन जैन, अध्यक्ष, व्यापारी असोसिएशन, लासलगाव.व्यापाऱ्यांमधील स्पर्धेमुळे मालाला योग्य भाव मिळतो. जुन्या व्यापाऱ्यांनी अडथळा आणून लिलाव बंद पाडणे चुकीचे आहे. नवीन व्यापाऱ्यांना प्रशासनाने कायमस्वरूपी संरक्षण देऊन लिलावात सहभागी करून घ्यावे.- मंगेश ठाकरे, मका उत्पादक शेतकरी, काजीसांगवी.कांदा व धान्य व्यापाऱ्यांना असोसिएशनतर्फे यापूर्वी परवानगी देऊन सभासद करण्यात आले आहे. मी लायसन्सधारक असून स्वतंत्र खरेदी सुरू केल्यामुळे स्पर्धेतून शेतकऱ्यांना चांगला भाव मिळाला. त्यामुळे असा दुजाभाव करणे योग्य नाही. मी बाजार समितीचा परवानाधारक असूनही असोसिएशनचा सदस्य नसल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली. मला सदस्यत्व देण्यात यावे.- अरुण चव्हाण, ए. व्ही. बॉयलर, दिव्या ट्रेडिंग, सोग्रस.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.