Nashik Farmers : नाशिक लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य बाजार आवारावर डाळिंबासह पपई व पेरूच्या लिलावास सोमवार (ता. १०) प्रारंभ करण्यात आला..जिल्ह्यातील निफाड, चांदवड, येवला, सटाणा, देवळा, कळवण, मालेगाव व सिन्नर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव, राहुरी, राहाता व नेवासा आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर, वैजापूर व कन्नड आदी तालुक्यांतील गावांमध्ये शेतकऱ्यांकडून डाळिंबाची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. या शेतकऱ्यांना मालविक्रीची सुविधा मिळावी, यासाठी बाजार समितीतर्फे गेल्या ११ वर्षांपासून डाळिंब लिलाव सुरू आहेत..Pomegranate Farming Success Story: पाटेठाण पंचक्रोशीत डाळिंबाची क्रांती.डाळिंब उत्पादकांनी योग्य प्रतवारी करून डाळिंब विक्रीसाठी आणावा. वजनमापानंतर लगेच रोख पेमेंट देण्यात येणार आहे. डाळिंब खरेदीसाठी मोठ्या संख्येने खरेदीदार सहभागी होणार असल्याने स्पर्धात्मक बाजारभावातून योग्य दर मिळण्यास मदत होईल. तसेच डाळिंब खरेदीस इच्छुक व्यापाऱ्यांनी परवान्याबाबतच्या सर्व अटी पूर्ण केल्यास त्यांना तत्काळ परवाना देऊन पॅकिंग व साठवणुकीसाठी जागा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे बाजार समिती प्रशासनाने सांगितले..FPC Success Story: फ्रोझन शेतीमाल उद्योगात सोलापूरच्या ‘समूल’ची भरारी .मुहूर्तावर निलेश दरेकर (विंचूर, ता. निफाड) या शेतकऱ्यांच्या डाळिंबाच्या क्रेट्सचे उपस्थित शेतकरी व व्यापाऱ्यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. मुहूर्ताच्या लिलावात डाळिंबाला प्रतिकरेट ५१०० रुपये दर मिळाला. मदिना फ्रूट ॲन्ड व्हेजिटेबल कंपनीने हा माल खरेदी केला. दिवसभरात डाळिंबाची ३०५ क्रेट्स आवक झाली. डाळिंबाला किमान १००, कमाल २५०० रुपये प्रतिकरेट दर मिळाला..यावेळी पपई व पेरूच्या शेतीमालाचेही लिलाव करण्यात आले. पपईला किमान २००, कमाल ४६० आणि सरासरी ४०० रुपये प्रतिकरेट दर मिळाला. पेरूची १० क्रेट्स आवक झाली. याप्रसंगी बाजार समितीचे सचिव नरेंद्र वाढवणे, सहसचिव प्रकाश कुमावत, सर्व लिलाव प्रमुख काकासाहेब जगताप, प्रभारी हिरालाल सोनारे, पंकज होळकर, संजय होळकर, डाळिंब व्यापारी सैय्यद मोहसीन सैय्यद मुश्ताक, तबरेज शेख, जाकीर शेख, तौसीफ बागवान, अखलाख अन्सारी, दिलीप उगलमुगले, हैदर पठाण, राजू सैय्यद, कौशिक बागवान, संदीप शेलार, आकाश शिंदे, हर्षवर्धन होनराव, दत्तात्रय घोडे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.