Lasalgaon APMC Market: सभापती, उपसभापती निवड ऐनवेळी रद्द
APMC Election: लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापतिपदाच्या निवडीला शनिवारी (ता. ११) नाट्यमय वळण लागले. निवडणूक निर्णय अधिकारी तथा निफाडचे सहायक उपनिबंधक कांतिलाल गायकवाड यांची प्रकृती बिघडल्याने नियोजित निवडणूक प्रक्रिया रद्द करण्यात आली.