Darjeeling News : पश्चिम बंगालच्या दार्जिलिंग परिसरातील टेकड्यांवर सततच्या मुसळधार पावसामुळे झालेल्या भूस्खलनामध्ये १७ जणांचा मृत्यू झाला असून, अनेक जण बेपत्ता झाले आहेत. भूस्खलनामुळे अनेक घरे वाहून गेली, रस्त्यांचे मोठे नुकसान झाले असून, दुर्गम भागांतील अनेक वस्त्यांचा संपर्क तुटला आहे. जोरदार पावसामुळे या भागात पर्यटकही अडकले आहेत..पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मृतांना श्रद्धांजली अर्पण केली असून, दार्जिलिंग व आसपासच्या भागातील परिस्थितीवर आणि भूस्खलनांच्या घटनांवर बारकाईने लक्ष ठेवले जात असल्याचे म्हटले आहे. प्रशासन नागरिकांच्या मदतीसाठी सदैव तयार असल्याचे त्यांनी ‘एक्स’वर म्हटले आहे..राष्ट्रीय आपत्ती निवारण दल आणि जिल्हा प्रशासनाने तयार केलेल्या अहवालानुसार, सर्सली, जसबीरगाव, मिरिक बस्ती, धरगाव (मेची), नगरकाटा आणि मिरिक लेक परिसर अशा अनेक ठिकाणी मृत्यूंची नोंद झाली आहे. दार्जिलिंगचे उपविभागीय अधिकारी रिचर्ड लेप्चा यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस, स्थानिक प्रशासन आणि आपत्ती निवारण दलाच्या मदतीने बचाव आणि मदतकार्य सुरू आहे..Karul Ghat Landslide: मुसळधारेमुळे करूळ घाटात दरड कोसळली.मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पीडितांसाठी आर्थिक मदतीची घोषणा केली आहे. मात्र, किती आर्थिक मदत मिळेल हे स्पष्ट झालेले नाही. सोमवारी (ता. ६) बॅनर्जी या भागात येऊन परिस्थितीचा आढावा घेतील, असे सांगण्यात आले. बॅनर्जी यांच्या माहितीनुसार, १२ तासांमध्ये ३०० मिमीपेक्षा जास्त पाऊस झाल्यामुळे परिस्थिती गंभीर झाली आहे..स्थानिक स्वयंसेवी संस्था आणि जिल्हा प्रशासनाच्या समन्वयाने तात्पुरती मदत शिबिरे उभारण्यात आली आहेत, तर खबरदारीचा उपाय म्हणून बिष्णुलाल गाव, प्रभाग ३ लेक साइड आणि मिरिकमधील जसबीर गाव येथील अनेक कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे..Landslide : पावसाचा जोर वाढला; करूळ घाटात दरड कोसळली.४० जणांना वाचवलेमुसळधार पावसामुळे धार गाव, नगरकाता येथे भूस्खलन झाले असून, ढिगाऱ्याखालून किमान ४० जणांना वाचवण्यात आले. उत्तर बंगालचे विकास मंत्री उदयन गुहा यांनी परिस्थिती चिंताजनक असल्याचे सांगितले. येथील आणखी काही भागांत नागरिकांचा मृत्यू झाल्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. ‘‘आमच्या अहवालानुसार, मिरिकमध्ये अकरा आणि दार्जिलिंगमध्ये सहा जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र या आकड्याला अद्याप दुजोरा मिळालेला नाही,’’ असे गुहा यांनी ‘पीटीआय’ला सांगितले..काय आहे स्थिती?- भूस्खलनामुळे पश्चिम बंगाल आणि सिक्कीमला जोडणारा रस्ता आणि दार्जिलिंग आणि सिलिगुडीला जोडणारा रस्ता बंद झाला.- भूस्खलनामुळे मिरिक-सुखियापोखरी रस्त्यासह प्रमुख मार्गांवरील वाहतूक विस्कळित झाली, तर अनेक डोंगराळ वस्त्यांवरील दळणवळणाचे मार्ग बंद झाले.- भूतानमध्ये जोरदार पाऊस झाल्यामुळे उत्तर बंगालमधील पाण्याची पातळी वाढली.- रविवारी कोलकात्यात होणाऱ्या दुर्गा पूजा उत्सवाच्या समारोपानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी पूरग्रस्त भागाला भेट देणार.- रस्ते बंद झाल्यामुळे हजारो पर्यटक अडकले असून, त्यांच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र, अद्याप काही भागांत पाऊस सुरू असल्याने मदतकार्यामध्ये अडथळे येत आहेत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.