Yavatmal News: विदर्भ आणि मराठवाडा जोडणाऱ्या वर्धा- यवतमाळ - नांदेड या महत्त्वाकांक्षी रेल्वे प्रकल्पासाठी २०१६–१७ मध्ये भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. परंतु, मोबदला मिळण्यासाठी आठ वर्षे वाट पहावी लागली. त्यानंतर प्रकल्पाला गती मिळेल, अशी अपेक्षा असताना तसे होत नसल्याने शेतकऱ्यांकडून असंतोष व्यक्त केला जात आहे. .या रेल्वे मार्गापैकी अंदाजे १८५ किमी मार्ग विदर्भात, तर ९९ किमी मार्ग मराठवाड्यात येतो. कामाची प्रत्यक्ष सुरुवात २०१८ मध्ये झाली असली, तरी आजपर्यंत केवळ ६० टक्क्यांपर्यंतच काम पूर्ण झाले आहे. उर्वरित ४० टक्के काम अद्याप अपूर्ण असून अनेक ठिकाणी प्रकल्प रखडलेला आहे..Land Acquisition: परिक्रमा मार्गाच्या भूसंपादनास गोवर्धनमध्ये शेतकऱ्यांचा विरोध.यवतमाळ जिल्ह्यातील अमरावती सीमेपासून आर्णी, दिग्रस, नेर, पुसद या पट्ट्यात काही ठिकाणी माती भराव, लहान पूल आणि बोगद्यांची कामे झाली आहेत. भूसंपादनावेळी शेतकऱ्यांनी विकासाच्या अपेक्षेने जमिनी दिल्या..Land Acquisition: बीडमध्ये २४१ कोटींचा भूसंपादन घोटाळा.मात्र आजही अनेक शेतकऱ्यांना अंतिम भरपाई मिळालेली नाही. मोजदाद व सीमांकन रखडल्याने रेल्वे पट्ट्यालगतची जमीन लागवडीसाठी वापरता येत नसल्याने दरवर्षी पिकांचे नुकसान होत आहे. आठ वर्षांपासून जमीन ताब्यात नसतानाही उत्पन्नाचा कोणताही पर्यायी स्रोत उपलब्ध नसल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे..रेल्वे प्रशासनाकडून प्रकल्पाचे उर्वरित काम पुढील दोन वर्षांत पूर्ण करण्याचे आश्वासन दिले जात आहे. मात्र आतापर्यंतचा अनुभव पाहता स्थानिक शेतकरी आणि नागरिकांमध्ये साशंकता आहे. विदर्भ–मराठवाडा जोडणारा हा रेल्वे मार्ग प्रत्यक्षात केव्हा पूर्ण होणार, हा प्रश्न अद्यापही अनुत्तरितच आहे..https://youtu.be/NtZN0owd4Kw?si=UC6NSjiX5oBV41A9कामे अर्धवटमोठ्या पुलांची, स्टेशनची आणि सिग्नल यंत्रणांची कामे अद्याप अर्धवट अवस्थेत आहेत. काही ठिकाणी काम पूर्णपणे थांबले असून गेल्या दोन वर्षांत प्रगती अत्यंत मंद राहिली आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.