Land Acquisition: विमानतळासाठी सात गावांमध्ये भूसंपादन क्षेत्र ४० टक्क्यांनी कपात
Maharashtra Airport Development: पुरंदर येथील प्रस्तावित छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी भूसंपादन क्षेत्र ४० टक्क्यांनी कमी करण्यात आले आहे. सात गावांमध्ये शेतकऱ्यांचा विरोध लक्षात घेऊन बागायती जमीन वगळून नव्याने आराखडा तयार करण्यात आला आहे.