Wardha News : पोकरा टप्पा-२ अंतर्गंत प्रशिक्षणासाठी निवड झाली. मात्र त्यानंतर गाव या प्रकल्पातून वगळण्यात आले. याबाबत कृषी आयुक्त सूरज मांढरे यांची भेट घेत त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनीही माहितीबाबत अनभिज्ञता दर्शविली. त्यावरूनच एकंदरीत प्रकार संशयास्पद असल्याचा आरोप लहान आर्वी ग्रामपंचायतीचे सरपंच सुनील साबळे यांनी केला आहे. .सुनील साबळे यांच्या माहितीनुसार, आष्टी तालुक्यातील लहान आर्वी ग्रामपंचायत अंतर्गत सुजातपूरची २०२३-२४ या वर्षात नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा) अंतर्गंत निवड करण्यात आली. गाव आराखडा तयार करण्यासोबतच गरजांवर आधारित योजनांच्या अंमलबजावणीसाठी निवड झालेल्या गावातील सरपंचांसाठी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले. .या प्रशिक्षणाकरीता लहान आर्वी गावचे सरपंच म्हणून माझी निवड झाली. जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेकडून त्यासंबंधीचे पत्र मिळाले होते, असेही श्री. साबळे सांगतात. प्रशिक्षण पूर्ण केल्यावर लहान आर्वी ग्रामपंचायत अंतर्गंत पोकरा प्रकल्पाची ग्राम समिती गठित करण्यात आली. त्यानंतरच्या काळात प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी जिल्ह्यातील पहिली सभा देखील घेण्यात आली होती..POCRA Scheme : पोकरातील गैरप्रकाराच्या प्रकरणाची चौकशी सुरूच .मात्र काही दिवसांनी कृषी विभागाकडून लहान आर्वी ग्रामपंचायत हद्दीतील पोकरा प्रकल्प रद्द करण्यात आल्याचे कळविण्यात आले. पोर्टलवरूनच हे गाव गायब असल्याचे सांगण्यात आले. ही बाब धक्कादायक असल्याने या मागील नेमके कारण जाणून घेण्यासाठी वर्धा, नागपूर आणि पुणे येथील कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधत निवेदने देण्यात आली. परंतु त्यांच्याकडून कोणताच सकारात्मक प्रतिसाद मिळाला नसल्याचा आरोपही श्री. साबळे यांनी केला आहे..POCRA 2.0 Project: ‘पोकरा’चा टप्पा-२ रखडला.आयुक्तांकडून प्रतिसाद नाहीयशदातर्फे पुण्यात प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. या वेळी कृषी आयुक्त सूरज मांढरे यांची भेट घेत पोकरा प्रकल्पातून गाव का वगळले, याची विचारणा केली. त्या वेळी त्यांनी देखील नेमके कारण सांगण्यास असमर्थता व्यक्त केली..पोकरा प्रकल्प सुजातपूर शिवारातील शेतीच्या उत्कर्षासाठी महत्त्वाचा आहे. त्यामुळे पोकरा प्रकल्पात गावाचा समावेश करावा, अशी मागणी आहे. मात्र या संदर्भाने कृषी विभागाची भूमिका उदासीन आहे. - सुनील साबळे सरपंच, लहान आर्वी, वर्धा.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.