लाडकी बहीण योजनेसाठी ई-केवायसी करताना 'ओटीपी'बाबत तांत्रिक अडचणीओटीपी येत नसल्याच्या अधिक तक्रारीनेटवर्कच्या समस्येमुळे ही प्रक्रिया खोळंबत असल्याचे निदर्शनास .Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेसाठी लाभार्थी महिलांना ई-केवायसी बंधनकारक केले आहे. दरम्यान, ई-केवायसी प्रक्रिया करताना 'ओटीपी'बाबत काही तांत्रिक अडचणी येत आहेत. या समस्येची महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दखल घेत खुलासा केला आहे..''मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे E-KYC करताना OTP बाबत काही तांत्रिक अडचणी येत असल्याची बाब निदर्शनास आली आहे. महिला आणि बालविकास विभागाच्या वतीने याची गांभीर्याने दखल घेण्यात आली आहे. तज्ज्ञांच्या माध्यमातून याबाबत उपाययोजना करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. लवकरच ही तांत्रिक अडचण दूर होऊन E-KYC प्रक्रिया अधिक सुलभ आणि सुकर होईल. याबाबत मी सर्व लाडक्या बहिणींना आश्वस्त करते.'' असे तटकरे यांनी X वरील पोस्टमध्ये म्हटले आहे..Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना आता पती, वडिलांचे ई-केवायसी बंधनकारक, काय आहे नवीन नियम.सुरुवातीला ही प्रक्रिया अतिशय सहज, सोपी आणि सुलभ असून, महिला स्वत:च्या मोबाईलवरूनही ही प्रक्रिया पूर्ण करू शकतात, असे सांगण्यात आले होते. पण सध्या महिलांना ही प्रक्रिया करताना अनेक तांत्रिक अडचणी येत आहेत. सर्वाधिक तक्रारी ओटीपी येत नसल्याच्या आहेत. नेटवर्कच्या समस्येमुळे ही प्रक्रिया खोळंबत असल्याचे निदर्शनास आले आहे. .Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना यंदा दिवाळीत भाऊबीजेची भेट नाही? पडताळणी नंतरच मिळणार पुढचा हप्ता.लाभार्थी महिलांना 'ई- केवायसी'साठी दोन महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. या योजनेच्या लाभार्थी महिला, तिचा पती अथवा वडिलांचे ई-केवायसी अनिवार्य करण्यात आले आहे. या माध्यमातून लाभार्थी, तिचा पती अथवा वडिलांच्या वार्षिक उत्पन्नाची पडताळणी केली जात आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अडीच लाख रुपयांच्या वार्षिक उत्पन्नाची मर्यादा ठेवण्यात आली आहे. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.