लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाहीया योजनेअंतर्गत योग्यवेळी २,१०० रुपये देऊआम्ही जे जे बोललो तू पूर्ण करुउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत ग्वाही.Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. या योजनेअंतर्गत योग्यवेळी २,१०० रुपये देऊ. आम्ही जे जे बोललो तू पूर्ण करु, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बुधवारी विधानसभेत (Maharashtra Winter Session Nagpur 2025) दिली. विधानसभेत 'लाडकी बहीण' योजनेवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी पहायला मिळाली. काँग्रेस आमदार नाना पटोले यांनी, निवडणुकीच्या ऐन तोंडावर कोणताही नियम न पाळता ही योजनेची घोषणा केल्याचे सांगत, बोगस लाभार्थ्यांची नोंदणी केल्याचा आरोप केला. त्याला उपमुख्यमंत्री शिंदे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. .लाडक्या बहिणींनी तुमचा टांगा पलटी केला, शिंदेंचा पटोलेंना टोला''चांगल्या भावनेने ही योजना सुरु केली. नाना पटोले, तुम्ही म्हणाला होता की फसवी घोषणा आहे. तुम्ही हायकोर्टात गेला. हायकोर्टाने चपराक दिली,. तरीही आम्ही पैसे जमा केले. आचारसंहितेत पैसे बंद होतील, असे तुम्हाला वाटले. पण आम्ही आगाऊ रक्कम जमा केली. आम्ही पण बरोबर डोकं लावून काम केले. पण लाडक्या बहिणींनी तुमचा टांगा पलटी केला. तुम्ही खोडा घालण्याचा प्रयत्न केला. त्याला लाडक्या बहिणींनी जोडा दाखवला. तुम्ही लाडक्या बहिणींबद्दल बोलू नका,'' अशा शब्दांत एकनाथ शिंदे यांनी पटोलेंचा समाचार घेतला. .Ladki Bahin Yojana: ‘लाडकी बहीण’ च्या दोन हप्त्यांचे ३ हजार एकत्र मिळणार? ई-केवायसी अनिवार्य.८ हजार लाभार्थी शासकीय कर्मचारी, त्यांच्याकडून पैसे वसूल करणार- आदिती तटकरे महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी, या योजनेसाठी किती अर्ज आले? किती ग्राह्य धरले? याची माहिती विधानसभेत दिली. लाडकी बहीण योजनेच्या नोंदणीसाठी २ कोटी ६३ लाख ८३ हजार ५८९ अर्ज आले. त्यातील २ कोटी ४३ लाख ८२ हजार ९३६ अर्ज ग्राह्य धरले. महिला आणि बालविकास खात्याने २६ लाख आकडेवारीची पडताळणी केली. २६ लाखांपैकी ४ लाख आकडेवारीची फेरपडताळीची गरज होती. ८ हजार लाभार्थी बोगस नसून ते शासकीय कर्मचारी आहेत. ते नियमाने लाभ घेऊ शकत नाही. जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून त्यांच्याकडून योजनेचे पैसे वसूल करण्याचे काम सुरु आहे. सांगली प्राथमिक आरोग्य केंद्रातून आणि इतर शासकीय कर्मचाऱ्यांकडून पैसे वसुली केली जात असल्याचे तटकरे यांनी सांगितले..Ladki Bahin Yojana: निधीचा दुष्काळच ‘संशोधना’चा विषय.१२ ते १४ हजार पुरुष लाभार्थीदोन महिन्यांत वसुली पूर्ण होईल. लाडकी बहीण योजनेचे १२ ते १४ हजार पुरुष लाभार्थी आहेत. जेव्हा ही योजना सुरु केली; तेव्हा काही महिलांकडे स्वतःचे वैयक्तिक बँक खाते नव्हते. ते पुरुषांच्या अकाऊंटवर योजनेचा लाभ घेतात. यामुळे कोणतीही पात्र महिला लाभापासून वंचित राहणार नाही. त्या खरंच लाभार्थी आहेत. पण त्यांनी घरातील पुरुषांची खाती दिली आहेत. यासाठी फेरपाडताळणी सुरु आहे. ई-केवायसी झाल्यानंतर या योजनेत सुरळीतपणा पाहायला मिळेल, असे तटकरे म्हणाल्या..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.