लाडकी बहीण योजनेसाठी राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय ई-केवायसी करताना काही चूक झाल्यास दुरुस्तीची एक संधी ई-केवायसीमध्ये एकदाच सुधारणा करण्याची अंतिम संधी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत मंत्री आदिती तटकरे यांनी दिली माहिती.Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेसाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या योजनेसाठी ई-केवायसी (e-KYC) करताना काही चूक झाल्यास ती दुरुस्त करण्याची एक संधी सरकारने दिली आहे. याबाबतची माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी दिली. याबाबत त्यांनी एक्सवर पोस्ट केली आहे. .मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील बहुतांश लाभार्थी या दुर्गम, ग्रामीण भागातील आहेत. ई-केवायसी प्रक्रिया करत असताना त्यांच्याकडून काही चूक होणे स्वाभाविक आहे. या चुका दुरुस्त करण्याची संधी मिळावी, अशा आशयाची अनेक निवेदने विभागास प्राप्त झाली आहेत. .सदर योजना ही महिला सक्षमीकरणाच्या हेतूने राबविण्यात येत आहे, म्हणूनच या महिलांना ई-केवायसी करताना झालेली चूक सुधारण्याची संधी देणे अत्यंत गरजेचे आहे. हीच बाब लक्षात घेऊन ई-केवायसीमध्ये केवळ एकदाच सुधारणा करण्याची अंतिम संधी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत देण्यात येत आहे..Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज; सात दिवसात ३ हजार रुपये खात्यात जमा होणार.या सोबतच पती किंवा वडील हयात नसलेल्या लाडक्या बहिणींना ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठीही पोर्टलवर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे, असे तटकरे यांनी सांगितले आहे..Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचे १६५ कोटी लुटले, पुरुष आणि शासकीय कर्मचाऱ्यांचाही समावेश; मंत्री तटकरे.ही प्रक्रिया अधिक सुलभ आणि सोपी असावी, जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळावा यासाठी महिला आणि बालविकास विभाग कटिबद्ध असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. .लाडकी बहीण योजनेमुळे महायुती सरकारला विधानसभा निवडणुकीत मोठे यश मिळाले. त्यांच्यासाठी ही योजना गेमचेंजर ठरली. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला १,५०० रुपये दिले जातात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्य सरकारने ई-केवायसी प्रक्रिया बंधनकारक केली आहे. त्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदत आहे. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.